Join us

स्फुरदयुक्त सेंद्रिय खत सुपर फॉस्फो कंपोस्ट घरच्या घरी बनविण्याची सोपी पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:34 PM

कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही. याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो.

कोरडवाहू शेतीकरिता एकरी पाच टन व बागायती करिता एकरी १० टन शेणखताच्या वापराची शिफारस असली तरी एवढे शेणखत सर्वसाधारण शेतकऱ्याकरीता उपलब्ध होत नाही.

याकरीता आपण सुधारित सुपर फॉस्फो कंपोस्ट तयार करु शकतो. यात सर्वसाधारण शेणखताच्या तुलनेत नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची मात्रा जास्त असते.

साहित्यआपल्या शेतावर उपलब्ध असलेल्या पिक अवशेषापासून जसे की गव्हाचा काडा, ऊसाचे पाचट, बाजरीचा भुगा, कोकणात उपलब्ध असलेला भाताचे काड किंवा तुर, सोयाबीन, हरभरा इ. पिक अवशेष. शेण, कुळविण्यासाठी कल्चर.

कृती• लांबी- ९ ते १० फुट, रुंदी- ५ ते ६ फुट व खोली २ फुट या आकारमानाचा खड्डा करुन घ्यावा.• त्यावर पॉलीथिन किंवा कालबाह्य बॅनर (सहज व स्वस्त उपलब्ध असलेले) ह्या खड्ड्यामध्ये जमिनीच्या वर १ फुटापर्यंत अंथरुन घ्यावे.• यावर ४ ते ५ क्विंटल गव्हाचे काड, बाजरी, भात, ऊसाचे पाचट, तुर, सोयाबीन यांचे मिश्रण अथवा फक्त एकाच प्रकारचे सेंद्रिय पदार्थ टाकावे. यावर १०० ते १५० किलो शेण टाकावे.• कुजविण्याची प्रक्रिया लवकरात लवकर होण्याकरिता जवळच्या कृषि विद्यापीठात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या बुरशीचे मिश्रण की ज्यामध्ये ट्रायकोडर्मा पॅसीलोमाइस फ्युझीस्पोरस व अॅस्परजीलस अवमोरी इत्यादी असते हे १ किलो कल्चर वरील मिश्रणामध्ये टाकावे.• हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्यावेत.• उच्च प्रतीचा स्फुरदयुक्त सेंद्रिय खत तयार करण्यासाठी १०० ते १२० किलो रॉक फॉस्फेट (१२ ते २० टक्के पर्यंत) व ५०० मिली द्रवरुप किंवा १ किलो घनरूप स्फुरद विरघळविणारे जिवाणूंचे मिश्रण या सर्व तयार केलेल्या सेंद्रिय पदार्थ व शेणावर टाकुन पुन्हा मिसळून घ्यावे.• दर १५ दिवसांनी सर्व मिश्रण वर खाली करुन एकत्र मिसळून घ्यावे जेणेकरुन कुजण्याची प्रक्रिया एकसमान वेगाने होईल.• ९० दिवसानंतर चांगल्या प्रतिचे फॉस्फो कंपोस्ट तयार होईल.

फायदास्फुरदयुक्त सेंद्रिय खत (फॉस्फो कंपोस्ट) खताचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध स्फुरदाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

अधिक वाचा: आला उन्हाळा.. पिकांना पाणी कमी पडतंय; करा या तंत्राचा वापर वाढेल उत्पादन

टॅग्स :सेंद्रिय खतखतेशेतीशेतकरीपीकऊससेंद्रिय शेती