Lokmat Agro >स्मार्ट शेती > डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय

डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय

Simple solutions for early and maximum flowering in pomegranate fruit crops | डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय

डाळिंब बागेत लवकर व मोठ्या प्रमाणात फुलधारणा होण्यासाठी सोपे उपाय

डाळिंब बागेत पुरेपूर विश्रांती आणि ताण मिळाला असेल, त्या बागेत चांगली फुलधारणा होते. हलक्या जमिनीसाठी फळ काढणीनंतर २-३ महिन्याची विश्रांती दिली पाहीजे.

डाळिंब बागेत पुरेपूर विश्रांती आणि ताण मिळाला असेल, त्या बागेत चांगली फुलधारणा होते. हलक्या जमिनीसाठी फळ काढणीनंतर २-३ महिन्याची विश्रांती दिली पाहीजे.

शेअर :

Join us
Join usNext

डाळिंब बागेत पुरेपूर विश्रांती आणि ताण मिळाला असेल, त्या बागेत चांगली फुलधारणा होते. हलक्या जमिनीसाठी फळ काढणीनंतर २-३ महिन्याची विश्रांती दिली पाहीजे त्यापाठोपाठ १ महिन्यांचा ताण दिला पाहीजे तसेच काळ्या जमिनीसाठी १.५-२ महिन्याचा ताण आवश्यक असतो.

डाळिंब बागेत चांगल्या फुलधारणेसाठी काय करावे?

  • विश्रांती काळात फळ तोडणीनंतर लगेच बागेतील गुंतागुंत झालेल्या, वाळलेल्या फांद्या आणि झाडाचे शेंडे छाटावेत.
  • झाडाला अर्धी शेणखताची मात्रा, अर्धी पालाशची मात्रा, अर्धी स्फूरदची मात्रा आणि १/३ (तिसरा भाग) नत्राची मात्रा शिफारस केलेल्या प्रमाणे द्यावेत.
  • नंतर अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी व झाडे जतन होण्यासाठी नियमितपणे पाणी द्यावे.
  • ताण काळात जोपर्यत झाडाची पाने पिवळी पडुन पडत नाहीत, तोपर्यंत पाणी देणे बंद करावे.
  • ओलावा नियमित ठेवण्यासाठी गरजेपुरतेच पाणी द्यावे.
  • भारी जमिनीत ताण लवकर मिळावा म्हणून झाडाची मुळे खुरप्याच्या सहाय्याने उघडी करावीत.
  • १०-१५ सेमी लांबपर्यंत फांद्यांची हलकी छाटणी करावी त्यानंतर ताणाच्या तीव्रतेनुसार पानगळ करण्यासाठी इथेफॉन ३९% @ १-२ मि.ली./ली. फवारावे.
  • जेवढा जास्त ताण मिळेल तेवढी इथेफॉनची मात्रा कमी लागेल.
  • जेव्हा सर्व पाने गळाली असतील, तेव्हा फुलधारणेसाठी इथेफॉन ०.५ मि.ली./ली. पुरेसे असेल.
  • इथेफॉन सोबत डीएपी ५ ग्रॅ/लि वापरले असता, चांगला परिणाम होतो.
  • पानगळ केल्यामुळे समप्रमाणात फुलधारणा होणे.

जर वरील सर्व गोष्टी सुरळीतपणे केल्या तर २२-२८ दिवसात फुलधारणेस सुरवात होते आणि ४५ ते ५० दिवसात फुलधारणा पुर्ण होते.

अधिक वाचा: डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर

Web Title: Simple solutions for early and maximum flowering in pomegranate fruit crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.