Lokmat Agro >स्मार्ट शेती > अवघ्या ७ मिनिटात एकरभर पिकावर करता येईल औषध फवारणी

अवघ्या ७ मिनिटात एकरभर पिकावर करता येईल औषध फवारणी

smart agriculture: Spraying medicine by drone can be done on an acre of crop in just 7 minutes | अवघ्या ७ मिनिटात एकरभर पिकावर करता येईल औषध फवारणी

अवघ्या ७ मिनिटात एकरभर पिकावर करता येईल औषध फवारणी

ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार देते ४० % अनुदान

ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकार देते ४० % अनुदान

शेअर :

Join us
Join usNext

एका एकरातील पिकावर कीटकनाशक फवारणीला दीड ते दोन तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. पिकांची वाढ होईल, तसा कीटकनाशक फवारणीचा वेळही वाढतो. आधुनिक तंत्रज्ञानाने ड्रोनद्वारे मात्र अवघ्या सात ते आठ मिनिटांत एका एकरातील पिकांवर औषध फवारणी शक्य झाली आहे. जिल्ह्यातील पहिले कीटकनाशक अनुदानही दिले.

पाठीवर 10 ते 20 लिटरची टाकी आणि पंप घेऊन पिकावर कीटकनाशक फवारणीचे काम खूप कष्टाचे असते. खबरदारी न घेतल्यास विषबाधाचा ही धोका असतो. तर मोठ्या पिकांवर फवारणी करताना सर्पद अंशाने अन्य वन्य प्राण्यांपासूनही धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ड्रोन द्वारे औषध फवारणी करावी. कृषी पदवीधर अथवा शेतकरी उत्पादक कंपनी ड्रोन खरेदी करू शकते. या निर्णयानुसार कोणेवाडी येथील शेतकरी उत्पादक कंपनीने जिल्ह्यातील पहिले कृषी ड्रोन चेन्नईला गरुडा कंपनीकडून खरेदी केले. १० लाख ८० हजार रुपयांच्या या ड्रोनसाठी त्या क्षेत्राबाबत ड्रोनला निर्देश द्यावे शासनाने ४० टक्के अनुदान मंजूर केले. लागतात. 

शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन विलास ढेरे यांनी सांगितले की पिकावर कीटकनाशक फवारणी करण्याचे काम शेतकऱ्यांसाठी खूप कष्टदायक आणि धोकादायक असते. गुडघ्यापेक्षा अधिक उंच पिकांची वाढ झालेल्या शेतात सरपटणारे विषारी साप आणि विंचू दिसत नाहीत. या प्राण्यांकडून दंश होण्याचा धोका अधिक असतो. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आमच्या कंपनीने ड्रोन खरेदी केले आहे. दहा लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनची आहे. संगणकीय प्रणाली आणि गुगल मॅप शी कनेक्ट करून जेवढ्या क्षेत्रावर कीटकनाशक फवारणी करायची आहे त्या क्षेत्राबाबत ड्रोनला निर्देश द्यावे लागतात. एका एकरातील कोणत्याही पिकावर सात ते आठ मिनिटात हे दोन औषध फवारणीचे काम पूर्ण करते.

नागरी उड्डयन मंत्रालयाची परवानगी आवश्यक

■ ड्रोन उडविणाऱ्या व्यक्तीने अधिकृत प्रशिक्षण घेणे गरजचे आहे. शिवाय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या स्थानिक अधिकाऱ्याकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय कोणीही ड्रोन उडवू शकत नाही.

 

Web Title: smart agriculture: Spraying medicine by drone can be done on an acre of crop in just 7 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.