विकास खोब्रागडे
अलीकडच्या काही वर्षात शेतीसाठी अत्यावश्यक लागणारे विविध प्रकारचे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असून, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्याचा प्रत्यय येत आहे. शेती आणि शेतकरीही याला अपवाद नाहीत. ट्रॅक्टरपाठोपाठ विविध शेतोपयोगी लोखंडी अवजारे बाजारात आल्यामुळे जुने सर्वच लाकडी अवजारे नामशेष पारंपरिक पद्धतीने होणारी शेती आता होण्याच्या मार्गावर आहेत. यावर्षी मागे पडत चालली आहे. शेतकऱ्यांची खरिपाची पेरणी शेतीकामासाठी लागणारी लाकडी करण्यासाठी बैल नांगरणीला बाजू अवजारे आता दिसेनासी होऊ लागली आहेत. विदर्भातील अनेक गावांत हे चित्र दिसत आहे.
अलीकडच्या काही वर्षापासून अवजारांकडे दुर्लक्ष झाले तर मातीच्या लाकडी, वखर, तिफन, कोळपे, संपर्कामुळे त्यांना उधळी लागते. लाखी, बैलगाडी, लाकडी जू आदी त्यामुळे तुलनेने वापरायला सोयीच्या शेतोपयोगी सर्वच लाकडी अवजारे असणाऱ्या लोखंडी अवजारांनी काळ्या मातीतून काढता पाय घेऊन शेतीमध्ये चांगलाच जम बसविण्याचे चित्र आहे.
शेतोपयोगी लोखंडी अवजारे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याने शेतकरी लाकडी शेती अवजारे बनविण्यास धजावत नाही. याशिवाय दिवसेंदिवस लाकूडसुद्धा महाग झाल्याने शेती साहित्य बनविणे कठीण होऊ लागले आहे. लाकडी सामानाच्या किंमती आवाक्याबाहेर जात आहे. शिवाय या काळ्या मातीत राबणारी लाकडी तिफन आता नजरेआड होऊ लागली आहे.
बैलजोड्यांचा किमती आवाक्याबाहेर पोहोचल्याने बैलजोडी खरेदी करावी की नाही याचा विचार शेतकऱ्यांना चारदा करावा लागतो. याशिवाय शेतात मजूर मिळत नसल्याने शेतीच्या मशागतीसाठी हल्ली ट्रॅक्टरचा उपयोग वाढला आहे. शेतीच्या मदतीला आधुनिक यंत्रे आल्यामुळे वेळेची बचत होत आहे.
लाकडी अवजारांची वाढती किंमत मजुरी व दुरुस्तीचा खर्च पाहता हा खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. शिवाय या अवजारांकडे दुर्लक्ष झाले तर मातीच्या संपर्कामुळे त्यांना उधळी लागते. त्यामुळे तुलनेने वापरायला सोयीची असणारी लोखंडी अवजारे शेतीमध्ये वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शिवाय हवे तेव्हा शेतोपयोगी लोखंडी अवजारे बाजारात उपलब्ध असल्याने सोयीचे होते. -उद्धव सोनवाणे, प्रगतिशील शेतकरी, पळसगाव