ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीरातील विविध भागांची चाचणी करून आपल्या आरोग्याची काळजी घेतो त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील जमिनीची अर्थात मातीची चाचणी करून घेतली पाहिजे. मातीची चाचणी म्हणजे शेतीच्या आरोग्याची तपासणी होय.
जमीनीचे आरोग्य त्या जमिनीत असलेले घटक व गुणधर्म या सगळ्यांवर अवलंबून असते. जमिनीमध्ये खनिजद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ, जल आणि वायू हे चार घटक असतात, ते पिकांच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. ते योग्य प्रमाणात नसतील तर त्याचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतो.
त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. परीक्षणात नत्र, पालाश व स्फूरद या पोषक द्रव्यांचा, तांबे, लोह, मॅगनीज, जस्त या सूक्ष्म मूलद्रव्यांची तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक आदींची तपासणी केली जाते.
माती परीक्षणानुसार शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते. माती परीक्षणामुळे पिकांना द्यायच्या खताची मात्रा ठरवता येते. त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण ठेवून खर्च कपात करता येतो.
मातीचे नमुने तपासणी आवश्यक कशासाठी?
जमिनीत कोणत्या पोषक तत्त्वांची कमतरता आहे. कोणत्या वनस्पतींना या पोषक तत्त्वांचा फायदा होईल आणि त्यांचा सर्वोत्तम पुरवठा कसा करायचा हे ठरवण्यासाठी मातीचे नमुने तपासणी आवश्यक आहे.
काय असते जमिनीचे आरोग्य?
वनस्पती, प्राणी आणि मानव यांना टिकवून ठेवणारी महत्त्वपूर्ण सजीव परिसंस्था म्हणून काम करण्याची मातीची सतत क्षमता अशी माती आरोग्याची व्याख्या केली जाते. निरोगी माती आपल्याला शुद्ध हया आणि पाणी, भरपूर पिके आणि जंगले, उत्पादक चराऊ जमीन, वैविध्यपूर्ण वन्यजीव आणि सुंदर लँडस्केप देते.
मातीचा नमुना कधी व कसा घ्यायचा?
- मातीचा नमुना साधारणतः पिकाची कापणी झाल्यानंतर घ्यायचा आणि खत घातल्यानंतर तीन महिन्यांच्या आत घ्यायचा नाही.
- मातीचा नमुना घेताना त्या जमिनीचा रंग, उतार, पोत, खोली इ. यावरून विभागणी करून प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना घेतात.
- त्या जमिनीवर काल्पनिक नागमोडी वळणाची रेषा काढून रेषेच्या प्रत्येक टोकाला एक याप्रमाणे एकरी ६ ते ७, २२.५ सें.मी. खोलीचे इंग्रजी 'व्ही' आकाराचे खड्डे घेतात.
- 'व्ही' खड्यातील माती बाहेर काढून टाकून खाचेच्या बाजूचा दोन डेच जाडीचा मातीचा थर कापून घेतात.
- त्या मातीचे हाताने चार भागांत विभागणी करून समोरासमोरील दोन भाग बाजूला काढून टाकतात.
- उरलेले दोन भाग एकत्र करतात. वरील विभागणी पद्धत मातीचा नमुना अर्धा ते एक किलो होईपर्यंत करतात.
अधिक वाचा: Mango Varieties: आंबा लागवड करताय? कोणत्या जातीची निवड कराल