Lokmat Agro >स्मार्ट शेती > Soybean Biyane : सोयाबीनची उगवणशक्ती चांगली राहण्यासाठी कशी कराल साठवणूक वाचा सविस्तर

Soybean Biyane : सोयाबीनची उगवणशक्ती चांगली राहण्यासाठी कशी कराल साठवणूक वाचा सविस्तर

Soybean Biyane: How to store soybeans for better germination, read in detail | Soybean Biyane : सोयाबीनची उगवणशक्ती चांगली राहण्यासाठी कशी कराल साठवणूक वाचा सविस्तर

Soybean Biyane : सोयाबीनची उगवणशक्ती चांगली राहण्यासाठी कशी कराल साठवणूक वाचा सविस्तर

सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ व नाजूक असल्यामुळे बाकी पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर व जास्त प्रमाणात खराब होऊन उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.

सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ व नाजूक असल्यामुळे बाकी पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर व जास्त प्रमाणात खराब होऊन उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीन बियाण्याचे आवरण (सीड कोट) हे अत्यंत पातळ व नाजूक असल्यामुळे बाकी पिकांच्या तुलनेत सोयाबीनचे बियाणे लवकर व जास्त प्रमाणात खराब होऊन उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होतो.

शेतकरी बंधूंनी हवामानाचा अंदाज पाहून सोयाबीनची कापणी व मळणी करावी. सोयाबीनची प्रक्रिया व साठवणुकी दरम्यान खालीलप्रमाणे काळजी घेतल्यास बियाण्याची उगवणशक्ती चांगली ठेवता येईल.

बियाणे प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी
१) बियाणे प्रक्रियेदरम्यान जास्त तापमानापासून बियाण्याला वाचविण्याकरिता व बियाण्याला कमीत कमी इजा होण्याच्या दृष्टीने दरवर्षी बियाण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यापर्यंत आटोपावी.
२) सोयाबीन बियाण्याला कमी इजा होण्याकरिता आणि उगवणशक्ती चांगली राहण्याकरिता बियाणे प्रक्रिया करताना इन्क्लाईन्ड् बेल्ट कन्व्हेअरचा उपयोग करण्याची शिफारस विद्यापीठाद्वारे करण्यात आली आहे.
३) बियाणे प्रक्रीयेनंतर बियाण्याचा प्रातिनिधीक नमुना बीज परीक्षण प्रयोगशाळेत बीज परीक्षणाकरिता पाठवावा.

साठवणूक दरम्यान घ्यावयाची काळजी
१) बियाणे साठवणूकीपूर्वी बियाणे चाळणीने साफ करावे.
२) बियाणे साठवणी दरम्यान बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १२ टक्के पेक्षा जास्त नसावे. त्याकरिता ओलावा मापक यंत्राच्या (Moisture meter) सहाय्याने बियाण्यातील ओलाव्याचे प्रमाण तपासून घ्यावे.
३) बियाणे साठवताना पोते भिंतीपासून कमीत कमी तीन फुट दूर व खाली लाकडी फळ्या किंवा प्लॅस्टिक ब्लॉग्स वर ठेवावे.
४) बियाणे साठवणूक करण्याचे ठिकाण थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा पण त्यासाठी कूलरचा वापर करू नये. अन्यथा बियाण्याची आर्द्रता वाढेल व त्यामुळे बियाणे खराब होऊ शकते.
५) आवश्यकतेनुसार भांडाराची साफसफाई व आवश्यकता पडल्यास कीडनाशकांची फवारणी करावी.
६) सोयाबीनचे बियाणे अतिशय नाजूक असते. थोड्यासुद्धा मारामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते. विशेषकरून जेव्हा सोयाबीनचे पोते वाहतुकी दरम्यान वरून खाली फेकले जाते तेव्हा बियाण्याला आतून इजा होते.
७) पाच फुटपेक्षा जास्त उंची वरून सोयाबीनचे बियाणे खाली पडले तर बियाण्याची उगवणक्षमता घटते त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या वाहतूक व साठवणुकी वेळी बियाण्याचे पोते जोराने किवा जास्त उंची वरून जमिनीवर आदळू नये.

अधिक वाचा: शेतकऱ्यांनो गुणवत्तापूर्ण सोयाबीनसाठी काढणी व मळणी करताना कशी घ्याल काळजी?

Web Title: Soybean Biyane: How to store soybeans for better germination, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.