Join us

Soybean Crop Management शेतकऱ्यांनो, सोयाबीन पिवळं पडण्यामागील जाणून घ्या कारणे आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 12:47 PM

सध्या पिकांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नसून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी दिसत आहे. अशा वेळी या पिवळ्या पडलेल्या सोयबीनचे काय व्यवस्थापन करायला हवे. जाणून घेऊया या लेखातून.

यंदा मान्सून वेळेवर आल्याने, नागरणी केलेल्या जमिनीच्या मशागतीला पुरेसा वेळ न देता शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. पुरेशी मशागत न झाल्यास सध्या पिकांना ऑक्सिजन पुरेसा मिळत नसून त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे जमिनीतून अन्नद्रव्य न घेता आल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी दिसत आहे.

अशा वेळी या पिवळ्या पडलेल्या सोयबीनचे काय व्यवस्थापन करायला हवे. जाणून घेऊया या लेखातून.

सोयाबीन पिवळं पडण्याची नेमकी कारणं काय?

१) मध्यम ते हलक्या जमिनीत कमतरतेची लक्षणे मोठ्याप्रमाणात दिसून येते.

२) लोहाची कमतरता विशेषतः कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीत लोहाची कमतरता होते.

३) क्लोरोफिल (हिरवापणा) निर्मितीसाठी लोह आवश्यक आहे. वनस्पतींमध्ये हिरवे रंगद्रव्य क्लोरोफिल तयार करण्यासाठी लोह (फेरस) आवश्यक असते.

४) जमिनीत लोहाचा अपलब्धता बहुतेक जमिनीत वनस्पतींच्या आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य असते, परंतु पिकांना ते आवश्यक असताना उपलब्ध होत नाही. एकूण सूक्ष्म अन्नद्रव्येपैकी लोहाची गरज अन्नद्रव्य तयार करण्यासाठी जास्त गरज भासते.

५) जमिनीचा सामू (पीएच) जास्त असणेः बऱ्याचदा जमिनीचा सामू (पीएच) ७.५ पेक्षा जास्त असतो, त्या जमिनीतील लोह (फेरस) या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येत नाही.

६) ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने मुळा‌द्वारे लोह कमी शोषले जाते, ज्यामुळे क्लोरॉसीस होते.

पिवळी पडलेल्या सोयबीनचे व्यवस्थापन

१) सध्या उभ्या पिकात सोयाबीन पिकांची पाने जास्तच पिवळी दिसत असल्यास त्वरित फेरस सल्फेट (सूक्ष्म अन्नद्रव्ये) १० किलो + शेणखत १०० किलो प्रती एकर या प्रमाणात घेऊन शेतात कोळपणी अगोदर मातीत मिसळून द्यावे.

२) फवारणीद्वारे व्यवस्थापनात सूक्ष्म अन्नद्रव्ये २० ग्रॅम + अमिनो असिड / सीविड अर्क ३० मिली + आवश्यक असल्यास किडीची तीव्रता बघून कीटकनाशकची फवारणी करावी.

३) त्वरित पानामधील कमतरता भरून काढण्यास व काही प्रमाणात नत्राची कमतरता दिसत असल्यास २% डीएपी किंवा युरिया (२०० ग्रॅम / १० लिटर पाणी) घेऊन फवारणी करावी.

४) रोपटे अवस्थेतच झाडांची वाढ खुंटल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते त्यामुळे वरील उपाययोजना करण्यास टाळाटाळ करू नये.

सोयाबीन पेरणी करताना शेतकरी केवळ रासायनिक खत व्यवस्थापन करतात, त्यात केवळ मुख्य अन्नद्रव्ये जसे कि नत्र : स्फुरद : पालाश (डीएपी, एसएसपी, २०:२०:०:१३, १०:२६:२६) असे घटक टाकतात. यातून केवळ तीनच मुख्य अन्नद्रव्ये पिकांना जातात. उर्वरित अन्नद्रव्ये जसे कि कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, लोह व इतर घटक देखील आवश्यक आहे.

सचिन आढेवॉटर संस्था, पुणे

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतकरीशेतीशेती क्षेत्रपीकसोयाबीन