Lokmat Agro >स्मार्ट शेती > Soybean Crop Management : अतिवृष्टीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

Soybean Crop Management : अतिवृष्टीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

Soybean Crop Management: How to manage soybean crop in heavy rain? | Soybean Crop Management : अतिवृष्टीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

Soybean Crop Management : अतिवृष्टीत सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे.

सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मागील दोन ते तीन दिवसात सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे.

अशा परीस्थीतीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच खालील नमुद केलेल्या उपाय प्रमाणे सोयाबीन पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे.

कसे कराल व्यवस्थापन
- सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे.
अशा परिस्थीतीमध्ये सर्व प्रथम शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा.
- या वातावरणामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
- गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक २ किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे.

सध्या सर्वत्र सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
१) क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५% - ६० मिली (३ मिली प्रति १० लिटर पाणी) प्रती एकर किंवा
२) इंडाक्झाकार्ब १५.८% - १४० मिली (७ मिली प्रति १० लिटर पाणी) प्रती एकर किंवा
३) असिटामाप्रीड २५%+ बाईफैंन्थ्रीन २५% -१०० मिली (५ मिली प्रति १० लिटर पाणी) प्रति एकर किंवा
४) क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३०% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.६०% - ८० मिली (४ मिली प्रति १० लिटर पाणी) प्रती एकर किंवा    
५) आयसोसाक्लोसिरम ९.२% - २४० मिली (१२ मिली प्रति १० लिटर पाणी) प्रती एकर

तसेच येणाऱ्या काळात शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन फवारणी करावी.
१)  टेब्युकोनॅझोल १०%+ सल्फर ६५% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम प्रति एकर (२५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा
२) टेब्युकोनॅझोल २५.९% -२५० मिली (१२.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात) किंवा
३) पायरोक्लोस्ट्रोबीन २०% - १५० ते २०० ग्रॅम (७.५ ते १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) किंवा
४) पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३%+ इपिक्साकोनाझोल ५ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - ३०० मिली (१५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात) प्रति एकर फवारावे.

याबरोबरच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी युक्त औषधाची ४ किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी
-
कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी.
- वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.
- लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये.
- फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
- किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
०२४५२-२२९०००

अधिक वाचा: Cotton Crop Management : कपाशी पिकात पाणी साचलय कसे कराल व्यवस्थापन

Web Title: Soybean Crop Management: How to manage soybean crop in heavy rain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.