Join us

Soybean Khodmashi : सोयाबीन खोडमाशीचा बंदोबस्त करण्यासाठी करा हे सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 3:43 PM

पिकावरील कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनेच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

पिकावरील कीड आणि रोगांच्या व्यवस्थापनेच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी कृषी विभागाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.

सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भावचा शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने बंदोबस्त करावा, याविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सुचविलेल्या उपाययोजना अशा आहेत.

सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५ एस.सी. @ २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यातून पावसाची उघडीप पाहून फवारणी घ्यावी.

सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन (कामगंध) सापळे नियंत्रणासाठी वापरावेत.

सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि आर्थिक नुकसान पातळी नंतर प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप पाहून शेतकऱ्यांनी फवारणी करावी.

एकात्मिक व्यवस्थापन■ काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात.■ त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी.■ पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये १२ इंच x १० इंच आकाराचे हेक्टरी १० ते १५ पिवळे चिकट सापळे लावावेत.■ मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझेंक रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे.■ ५ टक्के निंबोळी अर्काची फवारा.

अधिक वाचा: Spray Pump Subsidy : बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप घ्या आता अनुदानावर कुठे कराल अर्ज

टॅग्स :सोयाबीनकीड व रोग नियंत्रणशेतकरीपीकशेती