या वर्षी सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या तारखांमध्ये बरीच तफावत आढळून आली आहे. काही भागात पिकाने ४ आठवड्यांचा तर काही भागात २० दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. सोयाबीन पिकाची सद्यस्थिती पाहता शेतकऱ्यांना खालील उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
- मागील आठवड्यात सोयाबीन पिकवणाऱ्या काही भागात सतत पाऊस पडल्याची नोंद आहे. शेतात पाणी साठत असेल तर शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
- काही भागामध्ये पाऊस नसल्यामुळे रोप अवस्थेत असणारे पीक सुकत आहे, या नाजुक अवस्थेदरम्यान पिकास संरक्षित पाणी देणे गरजेचे असते, अन्यथा कोवळी रोपे सुकून मरून जाऊ शकतात, त्यामुळे पिकाला विहीरीतील/कॅनल/नदीतील पाण्याद्वारे सिंचित करावे.
- पावसाने ताण दिलेल्या भागामधील सोयाबीन पीक सुकत आहे. त्याचप्रमाणे लोहाच्या कमतरतेमुळे पिकाचे पाने पिवळी पडू लागलेले आहेत, परंतु तो पिवळेपणा पाऊस पडल्यानंतर निघून जाऊ शकतो. पाने पिवळे पडण्याचे प्रमाण जास्त असल्यास पिकावर प्रती एक लीटर पाण्यात १० ग्रॅम फेरस सल्फेट व २ ग्रॅम चुना मिसळून स्वछ पंपाद्वारे पिकावर फवारावे.
- ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करताना पेरणी पूर्वी वापरवायचे (PPI) किंवा उगवणी पूर्वीची (PE) तणनाशके यापैकी एकाचा वापर केला आहे त्यांनी १५-२० दिवसानंतर डवरणी/कोळपे वापरून आंतरमशागत करावी, त्यामुळे पिकातील छोट्या-छोट्या तणांचे नियंत्रण होते त्याच बरोबर जमिनीत हवा खेळती राहते.
- ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करताना पेरणी पूर्वी वापरवायचे (PPI) किंवा उगवणी पूर्वीची (PE) तणनाशके यापैकी एकाचा वापर केला नाही त्यांचा सोयाबीनमध्ये खुरपणीचा खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी खालील शिफारस केलेल्या तणनाशकांपैकी कोणत्याही एका तणनाशकाची तणांना २ ते ३ पाने असताना त्यांवर नोजल वर हुड लावलेल्या पंपाद्वारे फवारणी करावी. इमाझेथापीर १० एसएल (१ लि./हे.) किंवा क्विझालोफॉप इथाइल ५ ईसी (१ लि./हे.) प्रती ४०० लि./हे. पाण्यामध्ये मिसळून.
- काही भागात खोड माशीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तिच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना थायामेथोक्सम १२.६०% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन ९.५०% झेडसी (१२५ मिली/हेक्टर) पूर्व-मिश्रित औषधांची फवारणी करावी.
- जेथे पीक १५-२० दिवसांचे असेल तेथे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावर क्लोराँट्रानिलीप्रोल १८.५ एससी (१५० मिली/हेक्टर) फुलोरा सुरू होण्याच्या ४-५ दिवसाआधी फवारणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हे पुढील ३० दिवसांसाठी पाने खाणाऱ्या किडींना नियंत्रित करेल.
- सोयाबीनच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी ठिकठिकाणी 'T' आकाराचे पक्षी थांबे बसवण्याचा सल्ला देण्यात येतो, त्यामुळे पाने खाणार्या शिकारी पक्ष्यांसाठी शेतात बसण्याची सोय होते.
- कीटकनाशक फवारणीसाठी कोन नोजल तर तणनाशक फवारणीसाठी फ्लड जेट/फ्लॅट फॅन नोजल वापरावा.
- आघारकर संशोधन संस्था, पुणेभा.कृ.सं.प. अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन योजना