Join us

Soybean Pik Salla : सोयाबीन पिकाचे शेंगा भरण्याच्या अवस्थेत कसे कराल व्यवस्थापन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 12:20 PM

सोयाबीन पीक सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच काही भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. पिकाच्या या अवस्थेदरम्यान त्यावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

सोयाबीनपीक सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यातच काही भागामध्ये सतत पाऊस पडत आहे. पिकाच्या या अवस्थेदरम्यान त्यावर वेगवेगळ्या किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी बांधवांना पुढील प्रमाणे सल्ला देण्यात येत आहे. 

  • जास्त पाऊस पडत असेल व शेतात सोयाबीनपीकामध्ये पाणी साठत असेल तर, उताराच्या दिशेने पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
  • रायझोबॅक्टेरिया एरियल ब्लाइट रोगाची लक्षणे दिसू लागल्यावर याच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेले बुरशीनाशके जसे पायरोक्लोस्ट्रोबिन 20% डब्ल्यूजी (375-500 ग्रॅम/हे) किंवा फ्लुक्सापायरोक्साईड 167 ग्रॅम/लि + पायरोक्लोस्ट्रोबिन 333 ग्रॅम/ली एससी (300 मिली/हे) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन + इपोक्कोसीकोनाजोल 50 ग्रा/ली एसई (750 मिली/हे) या बुरशीनाशकांची फवारणी करावी.
  • सतत पाऊस पडणाऱ्या भागात अॅन्थ्राक्नोज रोगाची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्याची सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर टेब्युकोनाझोल 25.9 ईसी (625 मिली /हे) किंवा टेब्युकोनाझोल 38.39 एस.सी. (625 मिली/हे) किंवा टेब्युकोनाझोल 10% + सल्फर 65%WG (1.25 kg/ha) किंवा कार्बेनाझम 12% + मँकोझेब 63% WP. (1.25 किलो/हे) पिकावर फवारावे.
  • पिवळा मोझॅक/सोयाबीन मोझॅक रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे शेतातुन उपटून नष्ट करावीत. अशी उपटलेली झाडे शेतात इतरत्र हातात घेऊन फिरू नये.  हाँ रोग पसरवणाऱ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  एसिटामिप्रीड 25% + बायफेन्थ्रिन 25% डब्ल्यूजी (250 ग्रॅम/हे) ची फवारणी करावी. किंवा त्याऐवजी पूर्व-मिश्रित कीटकनाशक थायोमेथोक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (125 मिली/हे) किंवा बीटासिफ्लुथ्रिन+इमिडाक्लोप्रिड (350 मिली/हे) देखील फवारता येऊ शकते. पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ठिकठिकाणी पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.
  • ऊंट आळीच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्याही एका रसायनाची फवारणी करावी. क्लोरएंट्रानिलिप्रोल 18.5 एससी, (150 मिली/हे) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट 01.90 ईसी (425 मिली/हे), किंवा ब्रोफ्लानिलाइड 300 g/l एससी (42-62 ग्रॅम/हे), किंवा फ्लुबेन्डियामाइड 20 डब्लूजी (250-300 ग्रॅम/हे) किंवा फ्लुबेन्डियामाइड 39.35 एससी (150 मिली) किंवा एसिटामिप्रिड 25% + बायफेन्थ्रीन 25% डब्ल्यूजी (250 ग्रॅम/हे) किंवा इंडोक्साकार्ब 15.80 ईसी (333 मिली/हे), किंवा लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन 04.90 % सीएस (300 मिली/हे) किंवा प्रोफेनोफोस 50% ईसी (1 ली/हे) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी (250-300 मिली/हे) किंवा पूर्व-मिश्रित बीटा-सायफ्लुथ्रीन 08.49 % + इमिडाक्लोप्रिड 19.81% डब्लू/डब्लू ओडी (350 मिली/हे) किंवा नोव्हॅलुरॉन+इंडोक्साकार्ब 04.50% एससी (825-875 मिली/हे) किंवा पूर्व मिश्रित थायामेथोक्सम + लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन (125 मिली/हे) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 09.30 % + लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन 04.60 % जेडसी (200 मिली/हे) ची फवारणी करावी.
  • तंबाखूवरील पाने खाणार्‍या आळीच्या (स्पोडोप्टेरा लिटुरा) नियंत्रणासाठी, शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे कोणतेही एक कीटक नाशक फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.इमामेक्टिन बेंझोएट 01.90% ईसी (425 मिली/हे) किंवा ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम/लिटर एससी (42-62 ग्रॅम/हे) किंवा ॲसिटामिप्रिड 25% + बायफेन्थ्रीन 25% डब्ल्यूजी (250 ग्रॅम/हे) किंवा फ्लुबेन्डियामाइड 20% डब्ल्यूजी (250-300 ग्रॅम/हे) किंवा फ्लुबेंडियामाइड 39.35% डब्ल्यू/डब्ल्यू एससी (150 मिली/हे) किंवा इंडोक्साकार्ब 15.80% ईसी (333 मिली/हे), किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी (250-300 मिली/हे) किंवा स्पिनोटेरम 11.7 एससी (450 मिली/हे) किंवा नोव्हॅल्युरॉन+इंडोक्साकार्ब 04.50 % एससी (825 - 875 मिली/हे).
  • आपल्या शेतात जर ऊंट आळी + शेंगा खणारी आळी + तंबाखूचे पाने खणारी आळी (स्पोडोप्टेरा लिटुरा) यांचा एकाच वेळी प्रादुर्भाव आढळून आला तर त्यांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना खालीलपैकी कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो: ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम/लिटर एससी (42-62 ग्रॅम/हे किंवा फ्लुबेंडियामाइड 39.35 % w/w SC (150 मिली/हे) किंवा इंडोक्साकार्ब 15.80% ईसी (333 मिली/हे), किंवा नोव्हॅल्युरॉन+इंडोक्साकार्ब 04.50% एससी (825-875 मिली/हे). 
  • जर पाने खाणार्‍या अळ्यांचा (हिरवा सेमिल्युअर, हेलिओथिस आणि तंबाखू सुरवंट) प्रादुर्भाव + शोषक कीटक (पांढरी माशी/ऍफिड/जॅसिड्स) + शेंगा पोखरणार्‍या किडी (चक्री भुंगा/खोड माशी) यांच्या एकत्रीत नियंत्रणासाठी पुढीलप्रमाणे पूर्व मिश्रित कीटकनाशक फवारण्याचा सल्ला देण्यात येतो. थायामेथोक्सम 12.60%+ लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 09.50% झेडसी  किंवा बीटासिफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड किंवा ॲसिटामिप्रिड 25% + बायफेन्थ्रीन 25% डब्ल्यूजी किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 09.30% + लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन 09.50% झेडसी.
  • कमी कलावधीत पक्व होणार्‍या वाणांच्या कोवळ्या शेंगा उंदराने खाल्ल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी फ्लोकोउमाफेन 0.005% हेक्टरी 15-20 वड्या उंदरांच्या छिद्रांजवळ ठेवावेत.

आघारकर संशोधन संस्था, पुणेभा.कृ.सं.प. अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन योजना

टॅग्स :सोयाबीनशेतीपीककीड व रोग नियंत्रणशेतकरीपीक व्यवस्थापन