सर्व सोयाबीन बीजोत्पादकांना सुचित करण्यात येते की, मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत काही भागांमध्ये/मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे.
सोयाबीन प्लॉटमध्ये पाणी साचलेले असेल तर त्याचा निचरा करावा व जमिन वापसास्थितीत येईल असे प्रयत्न करावे. तसेच सोयाबीन पिकास अंदाजे ७० ते ७५ दिवस झाले असून पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक आहे.
अशा स्थितीत द्रवरुप खत ०:५२:३४ (१ टक्के) १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी म्हणजे शेंगामधील बियांची वाढ होऊन वजन तसेच प्रति एकरी उत्पादन वाढेल.
सद्यस्थितीत सोयाबीन पीकाच्या पानांवर, खोडावर तसेच शेंगावर 'शेंग करपा' (पॉड ब्लाईट) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. त्यामुळे सर्व सोयाबीन बिजोत्पादकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदर रोगासाठी शिफारस केल्याप्रमाणे फवारणी करावी.टेब्युकोनाझोल २५.९% ईसी (१२-१३ मिली/१० लिटर पाणी) (व्यापारी नाव फोलीक्यूर) किंवा टेब्युकोनाझोल १०% + सल्फर ६५% डब्युजी (२५ ग्रॅम/१० लिटर पाणी) (व्यापारी नाव स्वाधीन, विरु, हारु) या बुरशीनाशकांची किंवाशिफारस नसलेल्या परंतु उपयुक्त असलेल्या कार्बेन्डाझीम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी (२५ ग्रॅम/१० लिटर पाणी) (व्यापारी नाव साफ) अथवा मॅन्कोझेब ५०% + कार्बेन्डाझीम २५% डब्ल्युएस (२५ ग्रॅम/१० लिटर पाणी) (व्यापारी नाव स्प्रींट) यापैकी एका बुरशीनाशकाची तात्काळ फवारणी घ्यावी.
याशिवाय सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव काही प्रमाणात दिसुन येत असल्यास प्रादुर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. सदरील रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होत असल्याने सोयाबीन पिंकावरील पिवळा मोझेंकच्या व्यवस्थापनासाठी एकरी १५ ते २० पिवळे चिकट सापळे लावावे.
तसेच अॅसिटामिप्रिड २५% + बाइफेथ्रिन २५% डब्लुजी @ ५ ग्रॅम/१० लीटर पाणी किंवा बिटासाइफलुध्रिन ८.४९% + इमिडाक्लोप्रिड १९.८२% ओडी @ ७ मिली/१० लीटर पाणी किंवाथायमिथोक्झाम १२.६% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.६% झेड सी @ २.५० मिली/१० लीटर पाणी यापैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
तसेच सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळ्यांचा (तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळ्या, उंट अळ्या, घाटे अळी, इ.) प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठीक्लोरेंट्रानिलीप्रोल १८.५% @ ३ मिली/१० लीटर पाणी किंवाक्लोरेंट्रानिलीप्रोल ९.३०% + लॅबडा सायहॅलोथ्रीन ४.६०% ४ मिली/१० लीटर पाणी किंवानोव्हाल्युरॉन ५.२५% + इंडोक्झाकार्ब ४.५०% एससी @१७ मिली/१० लीटर पाणी किंवायांपैकी एका किटकनाशकाची पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
टीप: वर दिलेले किटकनाशकांचे प्रमाण हे साध्या पंपासाठी (नॅपसॅक) असुन पेट्रॉल पंपासाठी सदरचे प्रमाण ३ पट करावे.
अखिल भारतीय समन्वयीत सोयाबीन संशोधन प्रकल्पवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी०२४५२-२२०१२१