Join us

Soybean Seed Treatment सोयाबीनचा उत्पादन खर्च कमी करायचाय तर बियाण्यावर करा अशी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 2:38 PM

पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास व आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास रोगांच्या वाढीसाठी अनुकूल स्थिती बनते. सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे माठया प्रमाणावर नुकसान होते.

बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाण्यातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियांण्यांची उगवणक्षमता वाढविण्यासाठी व रोपे सतेज आणि जोमदार वाढवण्यासाठी बियाण्यांवर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते, याला बीजप्रक्रिया असे म्हणतात.

बीजप्रक्रिया फायदे- जमिनीतून व बियाणांद्वारे येणाऱ्या रोगांचा प्रदुर्भाव टाळता येतो.- बियाणाची उगवणक्षमता वाढते.- रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात.- नत्र व स्फुरदाची उपलब्धता वाढते.- रासायनिक खताची २०-२५ टक्के बचत होते.- पिकाच्या उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते.- जमिनीचा पोत सुधारतो.

रासायनिक बीजप्रक्रियापाऊस जास्त प्रमाणात झाल्यास व आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास रोगांच्या वाढीसाठी अनुकूल स्थिती बनते. सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे माठया प्रमाणावर नुकसान होते.रोग आल्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वीच बीजप्रक्रिया केल्यास रोगांचे व्यवस्थापन व्यवस्थितरित्या होते.

- सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी मिश्र उत्पादन कार्बोक्झीन ३७.५% + थायरम ३७.५% (व्यापारी नाव वीटावेक्स पावर) ३.० ग्रॅम/कि.ग्रॅ. ची बीजप्रक्रिया करावी.- या बीजप्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते.- बीजप्रक्रियेकरीता जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरीडी या बुरशीनाशकाची १० ग्रॅ./किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करता येते.रासायनिक बीजप्रक्रिया

मागील काही वर्षांपासून पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत खोड माशीचा प्रदर्भाव काही भागांमध्ये आढळून येत आहे व मागील वर्षी उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन शेतक-यांनी मोठया प्रमाणावर घेतल्यामूळे खरीप २०२३-२४ मध्ये पिकाच्या सुरूवातीच्या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुरशीनाशकाच्या व किटकनाशक यांचे संयुक्त उत्पादक बाजारात उपलब्ध झाले आहे.

यामध्ये अॅझॉऑक्झिस्ट्रेबीन २.५% + थायोफिनेट मिथाईल ११.२५% + थायोमिथोक्झाम २५ % एफएस हे घटक एकत्र करण्यात आले आहे व त्यामुळे बुरशीनाशक व कीटकनाशकाची वेगवेगळी बीजप्रक्रिया न करता सदर बुरशीनाशक + कीटकनाशकाची (व्यापारी नाव कॅस्केड/इलेक्ट्रोन/वार्डन) ०५ मिली/किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया केल्याने बुरशीजन्य रोगांचे व किडींचे व्यवस्थापन एकाच वेळी शक्य होते.

जैविक बीजप्रक्रियाबुरशी/किटक नाशकांच्या रासायनिक बीजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जीवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जीवाणू खताची (पीएसबी) २५० ग्रॅम प्रती १० कि.ग्रॅ. बियाण्यास प्रक्रिया करावी व नंतर सावलीमध्ये वाळवुन शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बीजप्रक्रियेसाठी वनामकृवि, परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा (रायझोफॉस) सुद्धा १० मिली/१ कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात उपयोग करता येतो.

१) अॅझॉक्झिस्ट्रेबीन २.५% + थायोफिनेट मिथाईल ११.२५% + थायोमिथोक्झाम २५% एफएस हे घटक एकत्र ०५ मिलि / किलो बियाणे (व्यापारी नाव कॅस्केड/इलेक्ट्रोन/वार्डन)२)  बियाण्यास रायझोबियम जीवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) १० मिली + स्फुरद विरघळविणारे जीवाणू खत (पीएसबी) १० मिली + ट्रायकोडर्मा १० मिली प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.किंवा द्रवरूप जैविक खताचा (रायझोफॉस) सुद्धा १० मिली/किलो बियाणे या प्रमाणात उपयोग करता येतो.

प्रा. अपेक्षा कसबेविषय विशेषज्ञ (कृषिविद्या), कृविके, तुळजापूर, जि. धाराशिव९१५६७४९८६३

 

 

टॅग्स :सोयाबीनशेतकरीशेतीपीकपेरणीखरीपपाऊसकीड व रोग नियंत्रण