Join us

Soybean Sowing शेतकऱ्यांनो सोयबीन पेरताय हे करा नाहीतर होऊ शकते नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 1:36 PM

सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी, पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते.

सोयाबीन हे आपल्या राज्याच्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या प्रादेशिक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड केले जाणारे आणि कमी कलावधीत येणारे खरीप हंगामातील लोकप्रिय पीक आहे.

सोयाबीनच्या बियांमध्ये असणारे १८ ते २० टके खाद्य तेल, ३८ ते ४० टक्के उत्तम प्रतीचे प्रथिने, त्याची वाढती उपयोगिता इत्यादी कारणांमुळे या पिकास जगभरात विशेष महत्व प्राप्त झाले आहे. जागतिक पातळीवर आपला देश पाचव्या क्रमांकाचा सर्वात 

सोयाबीन पेरणी पूर्वी लक्षात घेण्याच्या बाबी

  • सोयाबीन पिकाची सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी तसेच त्यापासून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी, पेरणीसाठी वापरावयाच्या बियाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक असते.
  • सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांहून जास्त असेल तर बियाण्याची गुणवत्ता चांगली असते व अशा बियाण्यापासून अंकुरण होऊन उगवून आलेले रोप निरोगी व सुदृढ तयार होते.
  • सोयाबीनचे बियाणे इतर पिकाच्या बियांपेक्षा खूप नाजुक असते त्यामुळे त्याची मळणी, हाताळणी व साठवणूक करताना खूप काळजी घ्यावी लागते, अन्यथा बियाण्याच्या पापुद्रयाला इजा पोचते व त्याची उगवण क्षमता कमी होते.
  • जमीन आणि पाण्याची उपलब्धता यानुसार पेरणीसाठी वाण निवडले पाहिजेत.
  • बियाणे खरेदी करताना गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडुनच बियाणे खरेदीस प्राधान्य द्या.
  • घरचे बियाणे कुणाकडून घेत असाल तर मळणी, हाताळणी व साठवणूक करताना कशी काळजी घेतली आहे ते पहा मगच बियाणे खरेदी करा.
  • घरचे बियाणे वापरत असाल तर उगवण क्षमता चाचणी करूनच बियाणे पेरा.
  • बियाण्यामध्ये रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी व उगवण क्षमता योग्य राखण्यासाठी पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया आवश्यक आहे.
  • सतत एकाच क्षेत्रात सोयाबीन पिक घेत असाल तर तज्ञांच्या मार्गदर्शनाने पेरणीपूर्व सल्ला घ्यावा.
  • गुणवत्तापूर्ण बियाण्याची निवड आणि संबंधित प्रक्रिया करूनच बियाणे पेरणीसाठी वापरणे आवश्यक असते.

अधिक वाचा: Paddy Variety शेतकऱ्यांनो सुधारित वाणांचे हे आहेत फायदे, कसे निवडाल भात पिकांचे वाण

टॅग्स :सोयाबीनपीकपेरणीशेतकरीशेतीखरीप