Lokmat Agro >स्मार्ट शेती > Soybean Threshing : बियाण्याचा खर्च वाचविण्यासाठी कशी कराल सोयाबीनची मळणी वाचा सविस्तर

Soybean Threshing : बियाण्याचा खर्च वाचविण्यासाठी कशी कराल सोयाबीनची मळणी वाचा सविस्तर

Soybean Threshing : How to do threshing of soybeans to save cost of seeds, read in detail | Soybean Threshing : बियाण्याचा खर्च वाचविण्यासाठी कशी कराल सोयाबीनची मळणी वाचा सविस्तर

Soybean Threshing : बियाण्याचा खर्च वाचविण्यासाठी कशी कराल सोयाबीनची मळणी वाचा सविस्तर

सोयाबीनच्या वाढत्या बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर दर्जेदार बियाणे तयार केले तर त्याचा फायदा फक्त त्यांनाच नाही तर इतर शेतकऱ्यांना देखील होईल.

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनच्या वाढत्या बियाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर दर्जेदार बियाणे तयार केले तर त्याचा फायदा फक्त त्यांनाच नाही तर इतर शेतकऱ्यांना देखील होईल.

अधिक उत्पादनासाठी, उत्तम उगवण शक्ती, रोग व कीड विरहित, जोमाने वाढणारे व भौतिक दृष्टया शुद्ध बियाणे असणे गरजेचे आहे. त्यासाठी पिकाच्या कापणी पासूनच बियाणीची योग्य काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

मळणी करतानी घ्यावयाची काळजी
१) बियाणे मळणी करण्याची जागा स्वच्छ, किडींपासून मुक्त असावी. ती शक्यतो लोकवस्ती व धान्य साठवणीपासून दूर असावी.
२) शुद्ध व दर्जेदार बियाणे मिळण्याकरीता मळणी यंत्र अगोदर साफ करून घ्यावे.
३) बऱ्याच वेळा मळणी यंत्र हे वेगवेगळ्या पिकांच्या अथवा वेगवेगळ्या सोयाबीनच्या वाणांच्या मळणीसाठी वापरले जाते. त्यामुळे अगोदरच्या पिकाचे बियाणे श्रेशिंग ड्रम किंवा जाळी मध्ये असू शकते.
४) आपण मळणी यंत्र साफ न करताच मळणी केली तर ते बियाणे आपल्या बियाण्यात एकत्र होऊन बियाण्याची भौतिक शुद्धता कमी होईल. त्यामुळे मळणी यंत्र वापरण्या अगोदर त्याची साफसफाई करणे गरजेचे आहे.
५) मळणी चालू करण्यापूर्वी मळणी यंत्र समांतर असल्याची खात्री करून घ्यावी. मळणी यंत्र समांतर नसल्यास चांगले बियाणे वाया जाते.
६) मळणी करतांना मळणी यंत्रामध्ये सोयाबीन टाकण्याचा वेग हा एक सारखा असावा जर सोयाबीन टाकण्याचा वेग कमी जास्त झाल्यास बियाण्यांना मार बसतो. तसेच मळणी करतांना बियाण्यांची फुट होत असेल तर श्रेशिंग ड्रम मधील काही स्टड कमी करावे.
७) भुशीमध्ये जर चांगले बियाणे जात असल्यास थ्रेशिंग ड्रमचा वेग कमी करावा.
८) सोयाबीन बियाणे अतिशय नाजूक असल्यामुळे मळणी करतांना ड्रमचा वेग ३५० ते ४५० फेरे प्रति मिनिट असावा.
९) मळणी करतांना ड्रमचा वेग जास्त असल्यास बियाण्यांना इजा होऊन उगवणशक्ती कमी होते. म्हणून या पिकाची मळणी करतांना काटेकोरपणे लक्ष ठेवून दक्षता घेणे जरूरीचे आहे.
१०) थ्रेशर मध्ये सोयाबीन टाकतांना आपला हात श्रेशिंग ड्रममध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी.
११) मळणी करतांना महिलांनी आपले केस व साडीचा पदर बांधून ठेवावा. बरेच वेळा अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी घेणे जरूरी आहे.

अधिक वाचा: हरभरा पिकातील येणाऱ्या रोगांपासून बचाव करण्यासाठी पेरणी अगोदर करा हे काम

Web Title: Soybean Threshing : How to do threshing of soybeans to save cost of seeds, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.