दिवसेंदिवस सोयाबीन पिकाचे महत्व व लोकप्रियता शेतकऱ्यांमध्ये वाढताना दिसत आहे, त्यामुळे याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
या वर्षी देखील महाराष्ट्रातील शेतकरी बांधव या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतील अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांना महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेल्या सोयाबीनच्या सुधारित वाणांची माहिती पाहूया.
महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेल्या सोयाबीनचे सुधारित वाण
१) एम ए सी एस १४६० (MACS 1460)• ८९-९१ दिवसांत पक्व होणारा वाण.• फुलांचा रंगः पांढरा.• जास्त उत्पादन क्षमताः २२-३८ क्विं./हे.• शेंगा फुटण्यास प्रतिरोधक.• विविध किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक.• मध्य व पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
२) एम ए सी एस १५२० (MACS 1520)• जास्त उत्पादन क्षमता : २१-२९ क्विं./हे.• फुलांचा रंगः जांभळा.• कालावधी : १०० दिवस.• शेंगा फुटण्यास प्रतिरोधक.• प्रकाश व उष्णतेस असंवेदनशील.• मराठवाडा व विदर्भात लागवडीस योग्य.
३) एमएसीएस एनआरसी १६६७ (MACS NRC 1667)• कुणीत्झ ट्रिप्सिन इन्हीबीटर मुक्त (KTI free) वाण.• एमएसीएस ४५० या जुन्या वाणाचा मुलतः व्युत्पन्न वाण (Essentially Derived Variety)• उत्पादन क्षमता : २०-२१ क्विं./हे.• फुलांचा रंग : जांभळा.• कालावधी : ९६-९८ दिवस.• सोया खाद्य पदार्थ व पशु खाद्य उद्योगासाठी उपयुक्त.• पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण भारतात लागवडीस योग्य.
४) के डी एस ९९२ (फुले दूर्वा)• अधिक उत्पादनक्षमता : २५-३० क्विं./हे.• कालावधी : १०० ते १०५ दिवस• फुलांचा रंग : जांभळा.• तांबेरा रोगास प्रतिबंधक.• शेंगा फुटण्यास प्रतिबंधक.• दक्षिण महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
५) के डी एस ७२६ (फुले संगम)• उत्पादन क्षमता : २०-२५ किं./हे.• फुलांचा रंग : जांभळा.• कालावधी : १०० ते १०५ दिवस.• तांबेरा रोगास प्रतिबंधक.• पश्चिम महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
अधिक वाचा: Mug Variety मुगाच्या या सुधारीत वाणांची निवड करा आणि भरघोस उत्पादन मिळवा
६) एम ए सी एस ११८८ (MACS 1188)• जास्त उत्पादन क्षमता : २५-३५ क्विं./हे.• फुलांचा रंग : पांढरा.• कालावधी : १०५-११० दिवस.• शेंगा फुटण्यास प्रतिरोधक.• विविध किडी व रोगांना मध्यम प्रतिबंधक.• पश्चिम व मध्य महाराष्ट्रात लागवडीस योग्य.
७) एम ए यु एस ६१२ (MAUS 612)• उत्पादन क्षमता : ३२-३५ किं./हे.• फुलांचा रंग : जांभळा.• कालावधी : ९३ ते ९८ दिवस.• शेंगा फुटण्यास प्रतिबंधक.• विविध रोग व किडींना प्रतिबंधक.• विदर्भ व मराठवाडा विभागात लागवड शिफारस.
८) एम ए यु एस ७२५ (MAUS 725)• उत्पादन क्षमता : २५-३१.५ किं./हे.• फुलांचा रंग : जांभळा.• कालावधी : ९० ते ९५ दिवस.• २० ते २५ टक्के शेंगामध्ये चार दाणे येतात.• विविध रोग व किडींना मध्यम प्रतिबंधक.मराठवाडा व विदर्भात लागवडीसाठी शिफारस.
९) पिडीकेव्ही अंबा (एएम एस १००-३९)• फुलाचा रंग : जांभळा.• परिपक्वतेचा कालावधी : ९४-९६ दिवस.• उत्पादकता : २८-३० किंटल/हेक्टर.• मुळकुज/खोडकुज या रोगास मध्यम प्रतिकारक.• शेंगा फुटण्यास प्रतिबंधक.• मुळावर रायझोबियमच्या गाठींचे व गाठींमध्ये लेग-हीमोग्लोबिनचे प्रमाण जास्त.
१०) ए एम एस १००१ (पीडी केव्ही येलो गोल्ड)• उत्पादन क्षमता : २२-२६ किं./हे.• फुलांचा रंग : जांभळा.• कालावधी : ९५ ते १०० दिवस.• मुळकुज/खोडकुज व पिवळा मोझॅक या रोगांस मध्यम प्रतिकारक.• विदर्भ व मराठवाडा विभागामध्ये लागवडीस योग्य.
अधिक वाचा: Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?