Lokmat Agro >स्मार्ट शेती > Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

Soybean weevil management by seed treatment | Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते.

विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते.

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते.

या किडीचा प्रादुर्भाव पिकाचे रोपावस्थेपासूनच म्हणजेच रोप १० ते १५ दिवसाचे झाल्यानंतर होतो. त्यामुळे त्याचा रोपांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पिकाची दुबार पेरणीची शक्यता असते मात्र बीज प्रक्रिया केल्यास सोयाबीनचे पीक जवळपास २५ ते ३० दिवसांपर्यंत या किडीस कमी प्रमाणात बळी पडते.

किडीचा जीवनक्रम
खोडमाशी लहान, चमकदार काळया रंगाची असुन त्यांची लांबी २ मि.मी. असते.
अंड्यातून निघालेली अळी पाय नसलेली, फिक्कट पिवळ्या रंगाची, २-४ मि.मी. लांब असते.

नुकसानीचा प्रकार
ही अळी प्रथम जवळच्या पानाच्या शिरेला छिद्र करते.
अळीनंतर पानाचे देठातून झाडाचे मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरुन खाते.
प्रादूर्भावग्रस्त खोड चिरून पाहिल्यास पांढूरक्या रंगाची अळी किंवा कोषाला लालसर नागमोडी भागात दिसते.
खोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुरूवातीचे अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
मोठ्या रोपावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा रोपावर खोडमाशीचे अळीचे प्रौढमाशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते.
खोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात, खोडात असतो.
अशा किडग्रस्त रोपावरील फुलांची गळ होते व शेंगातील दाण्याचे वजन कमी होऊन उत्पादनात १६-३० टक्के घट होते.

व्यवस्थापन
१) सोयाबीन पिकाची पेरणी करण्यापूर्वी बियाण्यास रासायनिक किटकनाशक थायोमेथोक्झाम ३० टक्के एफएस (उदा. पोलोगोल्ड, स्लेअर प्रो) १० मि.ली./१ कि. बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी त्यामुळे सुरूवातीच्या २५ ते ३० दिवस सोयबीन पीक खोडमाशी या किडीच्या प्रादुर्भावापासून मुक्त राहते.
२) बीज प्रक्रिया करतांना सर्वप्रथम रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर रासायनिक किटकनाशकाची व सर्वात शेवटी जैविक बुरशीनाशक व जैविक संर्वधकाची बीजप्रक्रिया करावी.
३) सोयाबीन पिकामधे उगवणीनंतर आठ ते दहा दिवसानंतर पिवळे चिकट सापळे लावून नियमित खोडमाशीच्या प्रादुर्भावर लक्ष ठेवावे (२५/हे.)

या किडीच्या वाढीसाठी उष्ण तापमान जास्त आर्द्रता, भारी पाऊस व त्यानंतर कोरडे वातावरण पोषक आहे. असे वातावरण आढळल्सास शेतकरी बांधवांनी आपल्या सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून सतर्क राहून नियंत्रणाचे उपाय योजावेत.

अधिक वाचा: Shankhi Gogalgai खरीप पिकातील शंखी गोगलगायीच्या नियंत्रणाचे सोपे उपाय

Web Title: Soybean weevil management by seed treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.