Lokmat Agro >स्मार्ट शेती > सोयाबीन पिकावर शिफारस केलेल्या कीटकनाशकांचीच फवारणी करा

सोयाबीन पिकावर शिफारस केलेल्या कीटकनाशकांचीच फवारणी करा

Spray only the recommended pesticides on the soybean crop | सोयाबीन पिकावर शिफारस केलेल्या कीटकनाशकांचीच फवारणी करा

सोयाबीन पिकावर शिफारस केलेल्या कीटकनाशकांचीच फवारणी करा

सोयाबीनची लागवड झालेल्या अनेक भागात गेल्या आठवडाभरात पावसाची संततधार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून सोयाबीनवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

सोयाबीनची लागवड झालेल्या अनेक भागात गेल्या आठवडाभरात पावसाची संततधार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून सोयाबीनवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोयाबीनची लागवड झालेल्या अनेक भागात गेल्या आठवडाभरात पावसाची संततधार असल्याचे वृत्त आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून सोयाबीनवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

या संदर्भात, सोयाबीन पिकावर हल्ला करणाऱ्या संभाव्य कीटकांच्या नियंत्रणासाठी, केंद्रीय कीटकनाशक मंडळाने अलीकडील काळात सोयाबीन पिकावर शिफारस केलेल्या कीटकनाशकांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या कीटकनाशकांपैकी एकाची फवारणी करावी.

१) घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पिकावर इंडोक्साकार्ब 15.80% ईसी (333 मिली/हेक्टर) फवारणी करावी. यासाठी आणखी पर्यायी कीटकनाशके आहेत, जसे इमामेक्टीन बेंजोएट 01.90 (425 मिलि/हे), किंवा ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम/ली. एस.सी. (42-62 ग्रॅम/हे), किंवा फ्लुबेन्डियामाइड 39.35 एस.सी. (150 मिलि) किंवा नोवाल्युरोन इंडोक्साकार्ब एस.सी. (875-825 मिली/हेक्टर) यांच्यापैकी एकाची पिकावर फवारणी करावी.

२) जर पिकावर बिहारी केसाळ सुरवंटाचा प्रादुर्भाव झाला असेल, तर त्याच्या नियंत्रणासाठी फ्लुबेन्डियामाइड 39.35 एस.सी. (150 मिली) किंवा इमामेक्टीन बेंजोएट 01.90 (425 मिली/हे.), किंवा ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम/ली एस.सी. (42-62 ग्रॅम/हे), फवारणीसाठी वापरावे किंवा स्पिनेटोराम 11.7 एससी (450 मिली/हे.) ची फवारणी करावी.

३) चक्री भुंग्याच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसू लागल्यावर, सुरुवातीच्या टप्प्यातच त्याच्या नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड 21.7 एस.सी. चा (750 मिली/हेक्टर) वापर करावा किंवा इमामेक्टीन बेंझोएट (425 मिली/हेक्टर) किंवा आयसोसायक्लोसेराम 9.2% डब्ल्यू डब्ल्यू डीसी (10% डब्ल्यू/व्ही) डीसी (600 मिली/हे) किंवा कार्टेप हायड्रोक्लोराईड 04% + फिप्रोनिल सीजी % 00.50 (200 मिली /हे) किंवा एसिटेमीप्रीड 25% + बायफेंथ्रिन 25% WG (250 ग्रॅम/हे) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18 एस.सी. (250-300 मिली/हेक्टर) किंवा प्रोफेनोफॉस 50 EC (1 ली/हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 18.5 एस.सी. 18.50% एस.सी. (150 मिली/हेक्टर) ची फवारणी करावी. चक्री भुंग्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर झाडाचे प्रभावित भाग उपटून नष्ट करावेत.

४) जर तुमच्या पिकावर खोड माशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर तिच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (125 मिली/हेक्टर) किंवा बीटासिफ्लुथ्रिन इमिडाक्लोप्रिड (350 मिली/हेक्टर) किंवा एसीटेमिप्रिड 25% + बायफेन्श्रीन 25% डब्ल्यूजी (250 ग्रॅम/हेक्टर) ची फवारणी करावी.

५) उंट अळीच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणतेही एक रसायन फवारावे
क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी (150 मिली/हेक्टर) किंवा इमामेक्टीन बेंझोएट 01.90 (425 मिली/हेक्टर), किंवा ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम/हे. (42-62 ग्रॅम/हे), किंवा फ्लुबेन्डियामाईड 20 WG. (250-300 ग्रॅम/हे) किंवा फ्लुबेन्डियामाईड 39.35 SC (150 मिलि/हे) किंवा एसीटेमिप्रिड 25% + बायफेन्थ्रीन 25% WG (250 ग्रॅम/हे) किंवा इंडोक्साकार्ब 15.8 SC (333 मिलि/हे), किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.90 CS (300 मिली/हे.) किंवा प्रोफेनोफॉस 50 ईसी (1 लि./हे.) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी, (250-300 मिली/हे.) किंवा पूर्वमिश्रित बीटासिफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड (350 मिली/हेक्टर) किंवा नोवल्युरॉन + इंडॉक्साकार्ब 4.50% एस. सी. (825-875 मिलि/हे) किंवा त्रिमिक्स्ड थायोमेथोक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (125 मिली/हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलित्रोल 09.30 % + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 04.60% ZC, (200 मिली/हेक्टर) ची फवारणी करावी.

६) तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी खालीलपैकी कोणत्याही एका रसायनाची फवारणी करा
इमॅमेक्टिन बेंझोएट 1.90 (425 मिली/हे.), ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम/लि. एस.सी. (42-62 ग्रॅम/हे), किंवा एसीटेमिप्रिड 25% + बायफेन्ध्रीन 25%WG (250 ग्रॅम / है) किंवा फ्लूबेंडियामाइड 20 WG. (250-300 ग्रॅम/हे) किंवा फ्लुबेन्डियामाइड 39.35 एससी (150 मिली) किंवा इंडोक्साकार्ब 15.8 एससी (333 मिली/हे.), किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18 एससी, (250-300 मिली /हेक्टर) किंवा स्पिनेटराम 11.7 एससी (450 मिली/हे.) किंवा नोवल्युरोन इंडॉक्साकार्ब 04.50% एससी (825-875 मिली/हेक्टर) ची फवारणी करावी.

७) पिकावर जर उंट आळी किंवा घाटे आळी किंवा तंबाखूचे पाने खाणारी आळी किंवा तिन्ही एकत्र आढळल्यास यांना नियंत्रिण करण्यासाठी, आपल्या पिकावर खालीलपैकी कोणत्याही एका रसायनाची फवारणी करा.
ब्रोफ्लानिलाइड 300 ग्रॅम/ली SC (42-62 ग्रॅम/हे), किंवा फ्लुवेंडियामाइड 39.35 SC (150 मिलि/हे) किंवा इंडोक्साकार्ब 15.8 SC (333 मिलि/हे), किंवा नोवाल्युरोन + इंडोक्साकार्ब 04.50% SC (825-875 मिली/हेक्टर) ची फवारणी करावी.

८) पाने खाणाऱ्या अळ्या (उंट आळी किंवा घाटे आळी किंवा तंबाखूचे पाने खाणारी आळी) आणि पांढरी माशी/तुडतुडे सारख्या रस शोषणाऱ्या किडी किंवा खोड माशी/चक्री भुंगा यांसारख्या कीटकांच्या एकाच वेळी नियंत्रणासाठी थायोमेथोक्सॅम 12.60% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.50% झेडसी. (125 मिली/हेक्टर) किंवा बीटासायफ्लुथ्रिन इमिडाक्लोप्रिड (350 मिली/हेक्टर) किंवा अॅसिटामिप्रिड 25% + बायफेन्ध्रीन 25% डब्ल्यूजी (250 ग्रॅम/हे) किंवा क्लोराँट्रानिलिनोल 9.30 + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 9.50% डब्लू.जी. (200 मिली/हेक्टर) ची फवारणी करावी.

९) जेव्हा पिवळ्या मोझॅक/सोयाबीन मोझॅक रोगाची लक्षणे दिसू लागतील तेव्हा रोगग्रस्त झाडे शेतातून उपटून टाका आणि या रोगांचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माश्या/अफिड्स रोखण्यासाठी एसीटामिप्रिड 25% + बायफेन्थ्रीन 25% डब्ल्यूजी (250 ग्रॅम/हेक्टर) फवारणीसाठी वापरावे. किंवा, थायोमेथॉक्सम लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (125 मिली/हेक्टर) किंवा बीटासायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड (350 मिली/हेक्टर) या कीटकनाशकांचीही फवारणी करता येते. त्यांच्या फवारणीद्वारे खोड माशी देखील नियंत्रित केली जाऊ शकते. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात ठिकठिकाणी पिवळे चिकट सापळे लावावेत.

१०) सतत पाऊस पडणाऱ्या भागात अँथ्रैक्नोंज रोगाची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्याची सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लवकरात लवकर टेब्युकोनाझोल 25.9 ईसी (625 मिली/हेक्टर) हे फवारणीसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. किंवा टेब्युकोनाझोल 38.39 एस.सी. (625 मिली/हे.) किंवा टेब्युकोनाझोल 10%+सल्फर 65% डब्ल्यूजी (1.25 किलो/हेक्टर) किंवा कार्बेन्डाझिम 12% + मँकोझेब 63% डब्ल्यू.पी. (1.25 किलो/हेक्टर) ची पिकावर फवारणी करावी.

११) रायजोक्टोनिया एरिअल ब्लाइट (RAB) या रोगाची लक्षणे दिसून येताच त्यावर नियंत्रण ठेवावे व शिफारस केलेले बुरशीनाशक पायरोक्लोस्ट्रोबीन 20% WG (375-500 ग्रॅम/हे) ची आपल्या पिकावर फवारणी करावी.

१२) सोयाबीनच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी ठिकठिकाणी 'T' आकाराचे पक्षी थांबे बसवण्याचा सल्ला देण्यात येतो, त्यामुळे पाने खाणाऱ्या शिकारी पक्ष्यांसाठी शेतात बसण्याची सोय होते.

१३) कीटकनाशक फवारणीसाठी कोन नोजल तर तणनाशक फवारणीसाठी फ्लड जेट/फ्लॅट फॅन नोजल वापरावा.

इतर महत्वाचे सल्ले

१) सोयाबीन पिकाच्या संरक्षणासाठी शिफारस केलेली रसायने (कीटकनाशके/बुरशीनाशके फवारण्यासाठी पुरेसे पाणी (नॅपसॅक स्प्रेअर किंवा ट्रॅक्टर चलित स्प्रेअरसाठी 450 लिटर/हेक्टर, पॉवर स्प्रेअरसाठी किमान 125 लिटर/हेक्टर) वापरावे.

२) सोयाबीन पीक फुलोऱ्यात असले तरी देखील कीड व रोगांपासून पिकाच्या संरक्षणासाठी योग्य व शिफारस केलेल्या रसायनांची फवारणी करावी.

३) कोणत्याही प्रकारच्या कृषी निविष्ठा खरेदी करताना दुकानदाराकडून नेहमी एक पक्के बिल घ्यावे ज्यावर बेंच क्रमांक आणि कालबाह्यता (एक्स्पायरी) तारीख स्पष्टपणे लिहिलेली असेल.

४) सोयाबीन पिकासाठी केंद्र सरकारच्या कीटकनाशक मंडळाने प्रसारित केलेल्या यादीमध्ये समाविष्ट असलेलीच रसायने (कीटकनाशके/तणनाशके/बुरशीनाशके) पिकासाठी वापरावीत.

५) ज्या रसायनांची (कीटकनाशके/तणनाशके/बुरशीनाशके) मिश्रित वापरासाठी शास्त्रीय शिफारस नाही, असे मिश्रण कधीही करू नये किंवा वापरू नका. त्यामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते.

६) तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या नर पतंगाला नष्ट करण्यासाठी एकरी चार कामगंध सापळे शेतात लावावेत.

एस ए जायभाय
सोयाबीन कृषीविद्यावेत्ता व वैज्ञानिक ड
आघारकर संशोधन संस्था, पुणे
भा.कृ.सं.प. अखिल भारतीय समन्वित सोयाबीन संशोधन योजना

7588559910

Web Title: Spray only the recommended pesticides on the soybean crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.