Lokmat Agro >स्मार्ट शेती > मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

Subsidy for digging of farm pond under Chief Minister's Sustainable Irrigation Scheme, where to apply? | मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे काढण्यासाठी अनुदान, कुठे कराल अर्ज?

नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गेल्या काही वर्षांत अनियमित आणि अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निर्माण होत आहे. अशा नेहमीच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनमानावर विपरित परिणाम होतो आहे. विशेष करून निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यावर उपाय म्हणून नवीन वर्षात 'मागेल त्याला शेततळे योजना' हा अभिनव कृषी उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे योजना?
ठिबक सिंचन, शेततळे, विहीर खोदकाम अशा विविध योजनांचा लाभ 'मागेल त्याला शेततळे योजनाद्वारे आता घेता येईल. पूर्वी या योजनांसाठी कृषी विभागाला नेमके संख्यात्मक उद्दिष्ट असायचे. त्यामुळे एखाद्या योजनेचा लाभ समजा १०० शेतकऱ्यांना द्यायचा आहे तर पहिले अर्ज दाखल केलेल्या १०० शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत असे. आता मात्र मागेल त्याला योजनेचा लाभ घेता येईल. त्यासाठी कृषी विभागाला अनलिमिटेड उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला नवीन वर्षात योजनेचा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत शेततळे लाभार्थी पात्रता
• अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक.
• अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक.
• अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील दोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.

अधिक वाचा: ड्रीप करताय? किती मिळेल अनुदान आणि कुठे कराल अर्ज

शेततळ्यासाठी आकारमान
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल मर्यादा ७५ हजार रुपये मर्यादित अनुदान देय राहील. शेततळ्याच्या आकारमानानुसार अनुदानाची रक्कम निश्चित केली आहे. अनुदानाची कमाल रक्कम ७५ हजार, ७५ हजारपेक्षा जास्त खर्च झाल्यास हा अतिरिक्त खर्च संबंधित लाभाथ्यनि स्वतः करणे अनिवार्य राहील.

लाभार्थी निवड
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून सोडतीनुसार लाभ मिळतो.

शेतकऱ्यांनी असा करावा
अर्ज महाडीबीटी पोर्टलचे http:/mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. शेतकरी स्वतःचा मोबाइल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र सीएससी, संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील.

Web Title: Subsidy for digging of farm pond under Chief Minister's Sustainable Irrigation Scheme, where to apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.