Lokmat Agro >स्मार्ट शेती > कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज

कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज

Subsidy for fertilizers for cotton and soybean crops; Apply here | कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज

कापूस आणि सोयाबीन पिकांच्या खतांसाठी मिळणार अनुदान; इथे करा अर्ज

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे यासाठी निविष्ठा पुरवठा.

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे यासाठी निविष्ठा पुरवठा.

शेअर :

Join us
Join usNext

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. 

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरिप हंगाम मध्ये खालील निविष्ठा पुरविण्यात येणार आहेत.
१) नॅनो युरिया - सोयाबीन  
२) नॅनो डीएपी - सोयाबीन
३) नॅनो युरिया - कापूस
४) नॅनो डीएपी - कापूस
५) मेटाल्डीहाइड - सोयाबीन

अर्ज करण्याचा कालावधी
१२ जून ते २३ जून,२०२४

या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १२ जुन २०२४ पासून सदर बाबींच्या टाईल्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

अधिक वाचा: Shettale Yojana शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता दीड लाखाचे अनुदान

Web Title: Subsidy for fertilizers for cotton and soybean crops; Apply here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.