Lokmat Agro >स्मार्ट शेती > Summer Chilli : उन्हाळी मिरची लागवड करताय 'हे' नक्की वाचा

Summer Chilli : उन्हाळी मिरची लागवड करताय 'हे' नक्की वाचा

Summer Chilli : latest news summer chillies planting tips read in details | Summer Chilli : उन्हाळी मिरची लागवड करताय 'हे' नक्की वाचा

Summer Chilli : उन्हाळी मिरची लागवड करताय 'हे' नक्की वाचा

Summer Chilli : शेतकरी उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) अधिक लागवड करतात याचे काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर

Summer Chilli : शेतकरी उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) अधिक लागवड करतात याचे काय आहे कारण ते जाणून घ्या सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

उन्हाळ्यात हिरव्या मिरचीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) अधिक लागवड करतात. त्यासाठी योग्य जमिनीची निवड, हवामान, बियाण्यांची निवड, खत, पाणी व्यवस्थापन, रोग कीडनियंत्रण आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती.

ठिबक, मल्चिंगवर मिरची लागवड

गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाळ्यात (Summer) विहीर, बोअरचा पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर पाणी उपलब्ध राहिले पाहिजे, या उद्देशाने शेतकरी ठिबकवर लागवड करत आहेत तसेच, मिरचीवर (Chilli) कुठलाही रोग पडू नये, यासाठी मल्चिंगचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

कमी कालावधीत जास्त उत्पन्न

उन्हाळी मिरचीला चांगला भाव राहतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) लागवड करत असतात. कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळते तसेच, उन्हाळी मिरची वर्षभराची कमाई करून देत असल्याने सर्वाधिक शेतकरी मिरचीकडे वळले.

'या' रोगांचा जास्त प्रादुर्भाव

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मावा, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव जास्त होतो. फुलकिडीचे पिले आणि प्रौढ पानाच्या व वरच्या बाजूस राहतात. ही कीड पाने खरबडून त्यातून बाहेर नेणारा रस शोषून घेतात. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

फुलकिडी रोखण्यासाठी काय कराल?

मिरचीतील तण काढणे, खत देणे आणि मुळांभोवती माती चांगली करणे आवश्यक आहे. प्रारंभीला दर पंधरा दिवसांनी तण काढणे आवश्यक असते तसेच, औषध फवारणी करायला हवी.

सहा दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यायला हवे

मिरचीच्या लागवडीचे यश चांगल्या रोपावर अवलंबून असते. रोप तयार करण्यासाठी ३ x २ मी. लांबी-रुंदीचे आणि २० सें.मी. उंचीचे गादी वाफे तयार करावेत. उगवण झाल्यावर पाच ते सहा दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे.

उन्हाळी मिरचीला भाव
 
सध्या उन्हाळी मिरचीची (Summer Chilli) लागवड करण्यात आली नाही. मात्र, आगामी १५-२० दिवसांत उन्हाळी मिरचीची शेतकरी लागवड करणार भर देणार आहेत.

सध्या बाजारात ठोक ८० रुपये किलो तर क्विंटलमध्ये ८ हजार रुपये भाव आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: कोकण, विदर्भात तापमानवाढ; काय सांगतोय IMD रिपोर्ट

Web Title: Summer Chilli : latest news summer chillies planting tips read in details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.