महाराष्ट्र राज्यातील हवामान बहुतांशी समशितोष्ण कोरडे आहे. कमी पाऊस व पावसातील खंड याचे प्रमाण जास्त असल्याने वेळोवेळी सिंचनाची आवश्यकता भासते. अशा वेळी बाष्पीभवन कमी करणे व पर्यायाने पिकांची पाण्याची गरज कमी करणे हे पाणी बचत करण्यासाठी आवश्यक असते.
आच्छादनामुळे पाण्याची कमतरता/दुष्काळ परिस्थितीत पिकाची पाण्याची गरज काही अंशी कमी होण्यास व पिक वाढीस व पर्यायाने उत्पादन वाढविण्यास मदत होते. उदाहरणार्थ संत्रा, डाळींब व अन्य पिकांना १२-१५ दिवसांच्या अंतराने पाणी देत असल्यास आच्छादनामुळे सिंचनाचा कालावधी २०-२५ दिवसांपर्यत वाढविता येते व पर्यायाने पाण्याची बचत होते. आच्छादनाचे इतर फायदे खालीलप्रमाणे आहेत.
आच्छादनाचे इतर फायदे१) आच्छादन मातीतील पाण्याचे बाष्पीभवन रोखते व ओलावा टिकून राहिल्यामुळे २५ ते ३० टक्के पाण्याची बचत होते.२) शेतमालाच्या गुणवत्तेत वाढ होते.३) बीज उगवण क्षमतेत वाढ होते.४) तणांची वाढ लक्षणीयरीत्या रोखली जाते.५) आंतर मशागतीचे कामे कमी होते व खर्चात बचत होते.६) आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अधिक असते.७) मातीला व पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.८) पीक काढणीस लवकर तयार होते.९) पावसाळ्यात पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.१०) पिकाच्या उत्पादकतेत २५% पर्यंत वाढ होते.
आच्छादनाच्या पद्धतीशेतीमध्ये वापरासाठी विविध प्रकारचे आच्छादन उपलब्ध आहेत.
१) सेंद्रिय आच्छादन (Organic mulch)सेंद्रिय आच्छादन हे भाताचा पेंढा, गव्हाचा पेंढा, उसाचा पाचट, साल, कोरडे गवत, लाकूड चिप्स, कोरडी पाने, भूसा, गवत इत्यादी नैसर्गिक पदार्थांपासून बनलेला असतो. ही सेंद्रिय आच्छादन सामग्री सहजपणे विघटित होतात. पावसाळ्यात टाकलेले आच्छादन बुडक्या पासून दूर करावे. सेंद्रिय आच्छादन वारंवार बदलण्याची आवश्यकता असते आणि कीटक, स्लग आणि कटवर्त्सना आकर्षित करते.
२) पेंढा आच्छादन (Straw mulch)हे सर्वात सामान्य वापरले जाणारे सेंद्रिय आच्छादन आहे. भाजीपाला पिके आणि फल पिकांसाठी भात आणि गव्हाचा पेंढा ही सहज मिळणारी आच्छादन सामग्री आहे. तांदूळ आणि गव्हाचा पेंढा कुजल्यानंतर माती अधिक सुपीक बनते.
३) गवताचे आच्छादनही सर्वात सहज उपलब्ध आच्छादनापैकी एक आहे. हिरवे गवत किंवा कोरडे गवत, गवत आच्छादनासाठी वापरले जाते. कुजल्यानंतर गवत जमिनीला नायट्रोजन पुरवते. पावसाळ्यात, हिरवे गवत तेथेच रूजते. म्हणून आच्छादनासाठी कोरडे गवत वापरावे.
झाडाच्या फांद्या आणि साल यांच्यापासून देखील सेंद्रिय आच्छादन तयार होतात. ते दीर्घकाळ टिकणारे आणि मातीची रचन सुधारण्यासाठी आणि ओलावा टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत. लाकूड चिप्स सामान्यतः फळबागा आणि लँडस्केपिंगमध्ये वापरली जातात. पण भारतात याचा उपयोग कमी प्रमाणात आहे.
अधिक वाचा: कमीत कमी जागेत घरच्या घरी भाजीपाला कसा पिकवाल?
४) भाताचा पेंढाभाताच्या पेंढ्याचा आच्छादन सामान्यतः हे जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास तण नियंत्रण आणि जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत करते.
५) कोको हस्कहे तण नियंत्रण, ओलावा टिकवून ठेवते आणि जमिनीत सेंद्रिय पदार्थ जोडते. भारतात रोपवाटिकासाठी कोको हस्क चा वापर सामान्यतः केला जातो.
६) पानेचिरलेल्या किंवा कंपोस्ट केलेल्या पानांपासून बनवलेला पालापाचोळा, जमिनीत सेंद्रिय पदार्थ जोडतो आणि ओलावा टिकवून ठेवतो.
७) कंपोस्टकंपोस्ट पालापाचोळा जमिनीची सुपीकता व ओलावा टिकवून ठेवते आणि तणांचे प्रादुर्भाव कमी करते. हे विघटित सेंद्रिय पदार्थांपासून बनविलेले असते आणि ते भाजीपाला, फळबाग आणि फुलांसाठी आदर्श आहे.