Lokmat Agro >स्मार्ट शेती > Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

Supari Lagvad: How does the arecanut you eat come from? How to cultivate | Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

Supari Lagvad तुम्ही खाता ती सुपारी कशी येते? कशी करतात लागवड

सुपारी या पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या, बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला २० ते ३५ अंश सेल्सियस तापमान मानवते. कोकणात सुपारीला पोफळ असेही म्हणतात.

सुपारी या पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या, बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला २० ते ३५ अंश सेल्सियस तापमान मानवते. कोकणात सुपारीला पोफळ असेही म्हणतात.

शेअर :

Join us
Join usNext

सुपारी या पिकासाठी समुद्रकाठच्या वाळूच्या, गाळाच्या पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होणाऱ्या, बारमाही पाण्याच्या जमिनी मानवतात. या पिकाला २० ते ३५ अंश सेल्सियस तापमान मानवते. कोकणात सुपारीला पोफळ असेही म्हणतात.

सुपारीच्या जाती
श्रीवर्धन भागातील 'श्रीवर्धन स्थानिक' जातीमध्ये निवड पध्दतीने 'श्रीवर्धनी' ही जात विद्यापीठाने विकसित केली असून, या जातीची सुपारी मोठ्या आकाराची आहे.
तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण अधिक असून, ती मऊ आहे.
आकार आकर्षक असल्याने त्यांना अधिक दर मिळतो.
झाडामागे प्रतिवर्षी २ किलो सोललेल्या सुपारीचे उत्पन्न मिळते.

पूर्वतयारी
लागवडीपूर्वी झाडेझुडपे तोडून जमीन सपाट करावी.
वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी सुरू अगर नीलगिरीची लागवड बागेभोवती करावी.
लागवडीसाठी ६० बाय ६० बाय ६० सेंटीमीटर आकाराचे खड्डे २.७ बाय २.७ मीटर अंतरावर खणावेत.
खड्ड्यांमध्ये उपलब्ध पालापाचोळा, २० किलो शेणखत किंवा कंपोस्ट, ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ६० ग्रॅम कार्बारील भुकटी व चांगली माती टाकावी.

लागवड
सुपारीची लागवड रोपांपासून करतात.
लागवडीसाठी जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, १२ ते १८ महिने वयाची निरोगी रोपे निवडावीत.
रोपांना कमीत कमी चार ते पाच पाने असावीत व बुंधा जाड व आखूड असावा.
दाट सावलीत तयार केलेली उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी वापरू नयेत.
निवडलेल्या रोपांची शक्यतो जून महिन्यातच लागवड करावी.
पाणी साचण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी ऑगस्ट वा सप्टेंबर महिन्यात लागवड करावी.
लागवड केल्यानंतर रोपांची चांगली वाढ होईपर्यंत कुंपण, पाणी आणि दक्षिणेकडील तीव्र सूर्यकिरणांपासून संरक्षण या बाबींकडे लक्ष द्यावे.

खत व पाणी व्यवस्थापन
सुपारीसाठी खताचा पहिला हप्ता ऑगस्ट सप्टेंबर तर दुसरा डिसेंबर-जानेवारी महिन्यात द्यावा.
उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने तर हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
पावसाळ्यात १० ते १५ दिवसांचा मोठा खंड पडून पाण्याचा ताण पडतो व नंतर झालेल्या पावसात फळे फुटून मोठ्या प्रमाणावर गळतात.
म्हणून अशावेळेस बागेस पाणी द्यावे.

पीक संरक्षण
देवी किंवा खवले कीड, कोळे रोग, अळंबी किवा मूळ कुजणे, बांड रोग, फळे फुटणे/तडकणे, खोड भाजणे या प्रकारच्या रोगांपासून सुपारी पिकाचे संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

काढणी
सुपारीची फळे तयार झाल्यावर त्यांचा रंग नारंगी होतो. फळे तयार झाल्यावर संपूर्ण घड काढतात. नंतर फळावरील सालीचे पट्टे काढतात. उन्हात ४० ते ४५ दिवस वाळवतात. ९० टक्के सुपारी ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात तयार होते.

अधिक वाचा: Mango Cultivation आंबा लागवड करताय? आलीय ही लागवडीची नवीन पद्धत

Web Title: Supari Lagvad: How does the arecanut you eat come from? How to cultivate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.