Lokmat Agro >स्मार्ट शेती > Suru Us Jati : सुरु ऊस लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप जाती कोणत्या; वाचा सविस्तर

Suru Us Jati : सुरु ऊस लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप जाती कोणत्या; वाचा सविस्तर

Suru Us Jati: Which top varieties give more yield for Suru sugarcane cultivation; Read in detail | Suru Us Jati : सुरु ऊस लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप जाती कोणत्या; वाचा सविस्तर

Suru Us Jati : सुरु ऊस लागवडीसाठी अधिक उत्पादन देणाऱ्या टॉप जाती कोणत्या; वाचा सविस्तर

Suru Us Lagwad सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे.

Suru Us Lagwad सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे, सुधारीत जातींचे शुद्ध व निरोगी बियाणे, ५ फुटावर रोप लागवड तंत्राचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन निश्चित मिळू शकेल.

सुरू हंगामासाठी उसाचे वाण
सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी सुरू हंगामासाठी खालील वाणांची लागवडीसाठी शिफारस केली आहे.

१) को. ८६०३२ (निरा)
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - १०६.००
साखर - १४.४४
वैशिष्ट्ये - या वाणाचे एकरी ७५ टनापेक्षा अधिक उत्पादन सुरू हंगामात शेतकरी घेत आहेत. सन १९९६ मध्ये प्रसारित केलेला हा वाण साखर कारखाना आणि शेतकरी यांच्या पसंतीस पडला आहे.

२) को.एम. ०२६५ (फुले-२६५)
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - १५०.००
साखर - २०.३१
वैशिष्ट्ये - को. ८६०३२ पेक्षा २० ते २५ टक्के जादा उत्पादन, क्षारयुक्त व चोपण जमिनीत इतर वाणांपेक्षा १४ महिन्यात अधिक उत्पादन हमखास मिळते.

३) को. ९२००५ (फुले ९२००५)
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - १२८.६९
साखर - १४.२१
वैशिष्ट्ये - कोल्हापूर जिल्ह्यात या वाणाचे अपेक्षित उत्पादन मिळते.

४) एम.एस. १०००१ (फुले १०००१)
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - १३२.८२
साखर - १९.३१
वैशिष्ट्ये - लवकर साखर तयार होणारा, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, क्षारपड जमिनीसाठी योग्य असलेला वाण.

५) को.एम. ९०५७ (फुले ९०५७)
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - १३०.०५
साखर - १७.६१ (गूळ)
वैशिष्ट्ये - गुळाचे उत्पादन अधिक मिळते. साखर उतारा चांगला असून उत्पादन तंत्राचा वापर केल्यास अपेक्षित उत्पादन मिळते. उसाचे वजन चांगले असून फूट कमी असल्याने जवळ लागवड करावी. गुळाचे उत्पादन अधिक मिळते.

६) फुले ११०८२
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - ११३.०८ 
साखर - १५.७७
वैशिष्ट्ये - नवीन वाण सुरू हंगामासाठी उत्तम, लवकर साखर तयार होणारा, अधिक साखर उतारा, उत्तम खोडवा, रोगप्रतिकारक.

७) फुले १५०१२
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - १३०.३८
साखर - १८.७७
वैशिष्ट्ये - नवीन वाण तीनही हंगामासाठी उत्तम, मध्यम पक्वता अधिक ऊस व साखर उतारा, उत्तम खोडवा, पाचट गळून पडते.

८) फुले १४०८२
सरासरी उत्पादन (मे.टन/हे.)
ऊस - १२८.६०
साखर - १७.५८
वैशिष्ट्ये - नवीन वाण सुरू हंगामासाठी उत्तम, पाण्याचा ताण सहन करणारा वाण, मध्यम पक्वता उष्ण कटिबंधासाठी शिफारस, अधिक ऊस व साखर उत्पादन.

अधिक वाचा: Phule Sugarcane 13007 : साखर उत्पादनात ८६०३२ पेक्षा सरस असणारी उसाची नवीन जात आली; वाचा सविस्तर

Web Title: Suru Us Jati: Which top varieties give more yield for Suru sugarcane cultivation; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.