रब्बी हंगामात कोरडवाहू क्षेत्रात करडईनंतर सूर्यफुल हे पिक तेलबिया पिक घेतले जाते. खरीप पिकाचा विचार केला तर रब्बी हंगामात जमिनीत साठवलेल्या ओलाव्यावर हे पिक घेतले जाते.
त्यामुळे पिक वाढीच्या काळात पावसाचा खंड पडला म्हणून पिकाचे नुकसान झाले असे होत नाही. कारण जमिनीच्या प्रकानुसार जमिनीत किती ओल साठविलेली आहे आणि पिकाची गरज हे आपणास पिक पेरणीच्या वेळी माहित असते.
म्हणून खरीपापेक्षा रब्बी हंगामात हमखास उत्पादन मिळण्याची शाश्वती असते. तसेच उत्पादनही चांगले मिळते. यावर्षी पाऊसमान चांगले आहे तरी सूर्यफुलाची लागवड करण्यास वाव आहे.
सूर्यफूलाचे सुधारित वाण१) भानूकालावधी (दिवस) : ८०-८५उत्पादन (क्विं/हे.) : १२-१४वैशिष्ट्ये : सर्व हंगामात पेरणीस योग्य, अवर्षण प्रवण विभागासाठी योग्य.
२)फुले भास्करकालावधी (दिवस) : ८२-८७उत्पादन (क्विं/हे.) : १४-१५वैशिष्ट्ये : पानावरील ठिपके रोगास सहनशील, अवर्षण प्रवण विभागासाठी योग्य. अधिक तेलाचे प्रमाण ३६%
३) एल.एस.एफ.-८कालावधी (दिवस) : ९०-९५उत्पादन (क्विं/हे.) : १०-१४वैशिष्ट्ये : पानावरील ठिपके रोगास सहनशील.
४) टी.ए.एस, ८२कालावधी (दिवस) : ९०-९५उत्पादन (क्विं/हे.) : १०-१२वैशिष्ट्ये : तेलाचे प्रमाण अधिक, महाराष्ट्रात लागवडीसाठी.
५) डी.आर.एस.एफ. १०८कालावधी (दिवस) : ९०-९२उत्पादन (क्विं/हे.) : १४-१६वैशिष्ट्ये : अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी, तेलाचे प्रमाण ३६%
६) डी.आर.एस.एफ. ११३कालावधी (दिवस) : ९०-९५उत्पादन (क्विं/हे.) : १४-१६वैशिष्ट्ये : अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी, तेलाचे प्रमाण ३७%
सूर्यफूलाचे संकरीत वाण१) एल.एस.एफ.एच.-३५ (मारुती)कालावधी (दिवस) : ९०-९५उत्पादन (क्विं/हे.) : १६-१९ (बागायती)वैशिष्ट्ये : अधिक उत्पादन, महाराष्ट्रात लागवडीसाठी, केवडा रोगास प्रतिकारक.
२) एस, सी.एच. - ३५कालावधी (दिवस) : ९०-९५उत्पादन (क्विं/हे.) : १२-१६वैशिष्ट्ये : महाराष्ट्रात लागवडीसाठी, केवडा रोगास प्रतिकारक, तेलाचे प्रमाण अधिक.
३) डी.आर.एस.एच-१कालावधी (दिवस) : ९२-९८उत्पादन (क्विं/हे.) : १३-१६वैशिष्ट्ये : अखिल भारतीय स्तरावर लागवडीसाठी, तेलाचे प्रमाण-४०%
४) एल.एस.एफ.एच.-१७१कालावधी (दिवस) : ९०-९५उत्पादन (किं/हे.) : १८-२२वैशिष्ट्ये : अधिक उत्पादन, केवडा रोगास प्रतिकारक महाराष्ट्रात व आंध्र प्रदेशात लागवडीसाठी.
५) पी.डी.के.व्ही.एस.एच.९५२कालावधी (दिवस) : ९०-९५उत्पादन (किं/हे.) : १८-२०वैशिष्ट्ये : मध्यम कालावधी, विदर्भात लागवडीसाठी योग्य.