Lokmat Agro >स्मार्ट शेती > भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

Take the paddy on the mule's saddle, the pulse crop and earn more profit | भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

भात खाचराच्या बांधावर घ्या हे कडधान्याचे पिक अन् कमवा अधिकचा नफा

कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते.

कोकणात tur lagvad तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

कोकणात तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भात खाचराच्या बांधावर घेतले जाते. तसेच हे पीक काही अंशी खरीप हंगामात वरकस जमिनीवर सलग अथवा आंतरपीक किंवा मिश्र पीक म्हणून घेतले जाते.

जमीन व पूर्वतयारी
तूर पिकास मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी, मुळे खोलवर जाऊ शकणारी भुसभुशीत जमीन मानवते. खार आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पहिले पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापशावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढण्यास मदत होते. नांगरणी नंतर कुळवणी करून ढेकळे फोडावीत व फळी मारून जमीन समपातळीत आणावी.

लागवडीसाठी वाण
सुधारीत जातींमध्ये कोकण तूर १, आयसीपीएल ८७, टी-२१, विपुला ही पिके १२० ते १५५ दिवसाची असून हेक्टरी १० ते १८ क्विंटल उत्पन्न मिळते.

कशी कराल पेरणी
पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम चोळावे व त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.
तूर पिकाचा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या इतर कडधान्य पिकांपेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच जून महिन्यात लवकरात लवकर करावी.
कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे होत नाही तसेच उत्पादनात घट येते.
सलग पीक घ्यायचे असल्यास हलक्या जमिनीत ६० सेंटीमीटर बाय ७५ सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी.
वाणाचा कालावधी आणि पेरणी अंतरानुसार हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते.
तुरीच्या सलग पिकासाठी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फूरद आवश्यकतेनुसार ५० किलो पालाश पेरणीच्या वेळी बियाण्यांच्या खाली मातीत चांगले मिसळून द्यावे.

आंतरमशागत
- पेरणीनंतर दहा दिवसात नांगे भरावेत तसेच आवश्यकता असल्यास विरळणी करावी.
पिकात १५ ते २० दिवसानंतर कोळपणी करावी तसेच एक ते दोन बेणण्या करून पीक ४५ ते ६० दिवसांचे होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावे.

पाणी व्यवस्थापन
तूर हे खरीप हंगामातील पीक असल्याने ते पावसावर वाढते. पावसामध्ये जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना कीड रोगापासून संरक्षण करणे आवश्यक आहे.

काढणी व साठवण
-
साधारणपणे ७५ ते ९० टक्के शेंगा वाळल्यावर पिकाची धारदार विळ्याने कापणी करावी.
- कापणी नंतर बांधलेल्या पेंढ्या वाळल्यावर शेंगा काठीने बडवाव्यात.
- आणि वारवणी/उफणणी करून दाणे आणि भुसा वेगळा करावा. तूर लागवडीचे योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी सरासरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.
- साठवणीपूर्वी तूर दाणे ४/५ दिवस उन्हात वाळवावे.

अधिक वाचा: तूर पिकात काढणीच्या कालावधीनुसार व पिक पद्धतीप्रमाणे वाण कसे निवडाल?

Web Title: Take the paddy on the mule's saddle, the pulse crop and earn more profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.