Lokmat Agro >स्मार्ट शेती > टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण कठीण म्हणून करा हे प्रतिबंधात्मक उपाय

टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण कठीण म्हणून करा हे प्रतिबंधात्मक उपाय

Take these preventative measures as control becomes difficult when diseases attack in tomato crops | टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण कठीण म्हणून करा हे प्रतिबंधात्मक उपाय

टोमॅटो पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यावर नियंत्रण कठीण म्हणून करा हे प्रतिबंधात्मक उपाय

Tomato Kid Niyantran टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

Tomato Kid Niyantran टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

शेअर :

Join us
Join usNext

टोमॅटो पिकांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होते. परंतु, हे रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो.

विषाणुजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडीमार्फत होतो. विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर औषधांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबविणे हाच एक उपाय आहे.

टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक अशा टोमॅटोच्या वाणांची निवड करावी.

शेतकऱ्यांना जर स्वतः च्या शेतात रोपे तयार करणे शक्य नसेल, तर बाहेरुन रोपे घेताना ते परवानाधारक रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत तसेच त्या रोपवाटिकेला इन्सेक्ट नेट, विड मॅट, दोन दरवाजे पध्दत व रोपवाटीकेच्या नियमावली प्रमाणे असावी.

रोपे खरेदी करताना ज्या भागांमध्ये टोमॅटो पिकावर विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या ठिकाणच्या रोपवाटिकेतून रोपे खरेदी करु नयेत.

प्रतिबंधात्मक उपाययोजना
१) रोपवाटीकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादी वाफ्यावर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड २ मिटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे, यामुळे रोगप्रसार करणाऱ्या किडींपासून रोपांचे संरक्षण होईल.
२) रोपवाटिकेमध्ये रसशोषक किडी (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
३) पुनर्लागवडीसाठी २५-३० दिवसांची रोपे पुरेसे हार्डनिंग करुन वापरावेत. पुनर्लागवडीच्यावेळी वाफ्यावर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. यामुळे पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते.
४) रोपाची पुनर्लागवड करण्यापूर्वी २५-३० दिवस अगोदर शेताच्या सर्व बाजूने ५-६ ओळी मका किंवा ज्वारी किंवा बाजरी अशी सापळा पिके म्हणून लावावे. त्यामुळे पांढऱ्या माशीला मोठ्या प्रमाणात अटकाव होतो.
५) रोपांची पुनर्लागवड करण्यापूर्वी इमिडॅक्लोप्रीड (१७.८ एस.एल.) ४ मिली प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे १०-१५ मिनिट बुडवावी.
६) टोमॅटो पिकास शिफारशी प्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात. तसेच नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा.
७) टोमॅटो पिकाला आवश्यकतेप्रमाणेच पाणी द्यावे व पीक तण विरहित ठेवावे.
८) ज्या भागात/शेतात वर्षानुवर्षे तिन्ही हंगामात टोमॅटो पीक घेतले जाते अशा ठिकाणी रोग व किडी प्रस्थापित झालेले असतात त्यामुळे पीक पद्धतीतील अशी साखळी खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी.
९) रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति एकर ३०-३५ निळे व पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत.
१०) टोमॅटोवरील टुटा नागअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी २० कामगंध जलसापळे (वॉटर ट्रॅप) लावावेत यामुळे टूटा किडीचे सामूहिक पतंग आकर्षण व मिलन प्रजोत्पादनामधील अडथळ्यांसाठी उपयोग होऊन किडींची संख्या आणि प्रादुर्भाव कमी करता येईल.
११) टोमॅटोच्या फळांची शेवटची तोडणी झाल्यास झाडे उपटून नष्ट करावेत. रोगग्रस्त पीक शेतात तसेच राहिल्यास नवीन लागवड केलेल्या पिकांवर अशा किडींव्दारे पुन्हा प्रसार होऊन विषाणू रोगांचा प्रादुर्भाव होतो.

अधिक वाचा: Beej Prakriya : बियाणे पेरणी अगोदर कशी कराल जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया

Web Title: Take these preventative measures as control becomes difficult when diseases attack in tomato crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.