Lokmat Agro >स्मार्ट शेती > सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या रेशीम शेतकऱ्याला मिळणार शासनाचा पुरस्कार; कसा कराल अर्ज?

सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या रेशीम शेतकऱ्याला मिळणार शासनाचा पुरस्कार; कसा कराल अर्ज?

The government's award will be given to the silk farmer who produces the most; How to apply? | सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या रेशीम शेतकऱ्याला मिळणार शासनाचा पुरस्कार; कसा कराल अर्ज?

सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या रेशीम शेतकऱ्याला मिळणार शासनाचा पुरस्कार; कसा कराल अर्ज?

राज्यातील रेशीम शेतकऱ्यांची संख्या वाढावी व त्यांना चालना मिळावी यासाठी रेशीम उद्योगाच्या प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत एक एकर रेशीम शेतीमधून शेतकऱ्याने किमान एक लक्ष रूपये इतके वार्षिक उत्पन्न मिळविल्यास अशा शेतकऱ्यांचा सन्मान रेशीम रत्न पुरस्कार देवून सत्कार केला जाणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात रेशीम शेती व त्यावर आधारीत उद्योगास चालना देवून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून तसेच रेशीम उद्योगातून रोजगार निर्मिती करणे शासनाचे उद्दिष्ट आहे.

राज्यातील रेशीम शेतकऱ्यांची संख्या वाढावी व त्यांना चालना मिळावी यासाठी रेशीम उद्योगाच्या प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत एक एकर रेशीम शेतीमधून शेतकऱ्याने किमान एक लक्ष रूपये इतके वार्षिक उत्पन्न मिळविल्यास अशा शेतकऱ्यांचा सन्मान रेशीम रत्न पुरस्कार देवून सत्कार केला जाणार आहे.

रेशीम उद्योगाच्या प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत राज्यातील लक्षाधीश रेशीम शेतकऱ्यांची कार्यशाळा व रेशीम रत्न पुरस्कार कार्यक्रमाकरिता प्रथम पुरस्काराकरीता ₹ ११,०००/-, द्वितीय पुरस्काराकरीता ₹ ७,५००/- व तृतीय पुरस्काराकरीता ₹ ५,०००/- प्रमाणे जिल्हानिहाय बक्षिस दिले जाईल.

त्याअनुषंगाने कार्यशाळा व रेशीम रत्न पुरस्कार कार्यक्रमाकरीता एकूण ₹ १५,९८,०००/- (अक्षरी रुपये पंधरा लक्ष अठ्ठयाण्णव हजार फक्त) इतका निधी प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत वितरीत व खर्च करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

पुरस्कारकरीता निकष
१) रेशीम कोष उत्पादक शेतकरी असावा.
२) महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

पुरस्कार करीता अटी व शर्ती
१) जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी केलेला शेतकरी असावा.
२) प्रती १०० अंडीपुंजास किमान ६० कि.ग्रॅ. कोषाचे उत्पादनाबाबत रेशीम विकास अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक.
३) रेशीम शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या कोष विक्री केल्याबाबतची पावती जिल्हा रेशीम कार्यालयास जमा करणे बंधनकारक.
४) किमान १ एकर वर तुती/टसर लागवड असावी.
५) कोष विक्रीतून वार्षिक उत्पन्न किमान १ लक्ष इतके असावे.
६) केंद्र शासन अथवा राज्य शासनामार्फत शासनाच्या योजनेच्या निकषाप्रमाणे रेशीम किटक संगोपनगृह बांधकाम केलेले असावे.

पुरस्कार निवडीकरीता कार्यपध्दती
१) रेशीम शेतकऱ्यांने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
२) जिल्हा रेशीम कार्यालयाने प्राप्त झालेल्या रेशीम शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी ७ दिवसांत करावी.
३) जिल्हा रेशीम कार्यालय संबंधित जिल्ह्यातून प्राप्त अर्जातून पुरस्कारासाठी निवड करतांना वर्षात एकरी सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक असणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून प्रादेशिक रेशीम कार्यालयामार्फत रेशीम संचालनालयास शिफारस करावी.

अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रे
१) ७/१२ (तुतीची नोंद असलेला)
२) लाभार्थ्यांच्या नावाचा ८ अ (खाते उतारा)
३) आधारकार्ड.
४) पासपोर्ट साईज फोटो.
५) लाभार्थ्याचा तुती लागवडीसह फोटो.
६) लाभार्थ्यांचा रेशीम किटक संगोपनगृहाचा फोटो.
७) तक्यात नमुद कोष विक्री केलेल्या पावत्या (मूळ प्रती)

रेशीम रत्न पुरस्कार मिळण्याकरीता रेशीम शेतकऱ्याने करावयाच्या अर्जाचा नमुना पुढील लिंकवर क्लिक करून पान क्रमांक: ४ पाहा. डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

Web Title: The government's award will be given to the silk farmer who produces the most; How to apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.