Lokmat Agro >स्मार्ट शेती > Groundnut Crop Management 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ

Groundnut Crop Management 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ

The use of 'this' fertilizer will increase the amount of oil in the groundnut along with good growth of the crop | Groundnut Crop Management 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ

Groundnut Crop Management 'या' खताच्या वापराने वाढेल भुईमुगातील तेलाचे प्रमाण सोबत पिकाची देखील होईल चांगली वाढ

भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे.

भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भुईमूग हे महत्त्वाचे गळीत धान्य पीक आहे. या पिकामध्ये उत्पादनवाढीसाठी मुख्य अन्नद्रव्ये म्हणजेच नत्र, स्फुरद आणि पालाश सोबतच जिप्समचा वाटा प्रमुख आहे. जिप्सममध्ये कॅल्शिअम (२४%) व गंधक (१८.६%) हे मुख्य घटक आहेत. हे दोन्ही घटक आऱ्याच्या वाढीसाठी आणि शेंगा पोसण्यासाठी उपयुक्त ठरतात. कॅल्शिअममुळे भुईमुगाच्या शेंगांची टरफले मजबूत बनतात तसेच शेंगांमध्ये दाणे चांगले भरतात.

शेंगदाण्यातील तेल तयार होण्याच्या प्रक्रियेत गंधकाची गरज अधिक असते तसेच गंधकामुळे भुईमुगाच्या मुळावरील गाठींचे प्रमाण वाढते, पानांचा आकार वाढून प्रत सुधारते, रोगांचे प्रमाण कमी होते तसेच भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन वाढते. 

कॅल्शियम आणि गंधक (सल्फर) या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यावर पिकांवर पुढीलप्रमाणे परिणाम दिसतात
• कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे कधीकधी शेंगा पोचट भरून त्याच्यावर सुरकुतल्या सारख्या रेषा उमटतात. मुळावर गाठी कमी लागतात. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते 
• गंधकाच्या कमतरतेमुळे नवीन पानाचा रंग फिक्कट हिरवा दिसतो. कोवळी आणि मधली पाने पिवळी पडू लागतात.अतिशय कमतरता असल्यास पाने कागदासारखी पातळ होतात. 

जिप्समच्या वापराचे फायदे
• जमिनीची सुपीकता वाढून ती भुसभुशीत होते. 
• क्षारपड जमीन जिप्समच्या वापरामुळे सुधारते. 
• बियाण्याची उगवण क्षमता जिप्सममुळे वाढते. 
• जिप्सममुळे पाण्यातील क्षारांचा निचरा होण्यास मदत होते. 
• सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. 
• पिकाची अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता वाढते. 
• फळांची, पिकांची गुणवत्ता सुधारते. 
• भुईमूग पिकासाठी कॅल्शिअम व गंधक यांचा पुरवठा करण्यासाठी जिप्सम स्वस्त पडते. जिप्सममध्ये कॅल्शिअम (२४ टक्के) व गंधक (१८.६ टक्के) हे मुख्य घटक आहे.  
• भुईमुगाच्या पेरणीपासून २५ ते ३५ दिवसांनी फुलधारणेवेळी प्रति हेक्टरी ५०० किलो जिप्सम द्यावा.  
• शेतकऱ्यांच्या शेतातील प्रात्यक्षिकामध्ये जिप्समचा उपयोग केलेल्या शेतामध्ये शेंगांचे उत्पादन वाढल्याचे आढळले.  
• भुईमुगाची काढणी होईपर्यंत शेतात घातलेला जिप्सम संपतो. म्हणून दर हंगामात या पिकाला जिप्सम द्यावा लागतो.  
• जिप्समची बारीक भुकटी फूल धरण्याच्या अवस्थेत जमिनीच्या पृष्ठभागावर शक्य तितकी झाडांच्या बुंध्याजवळ पसरून द्यावी. कारण जमिनीच्या पृष्ठभागाच्या ५ सेंटिमीटर थरातील कॅल्शिअम, आऱ्या व पोसणाऱ्या शेंगांच्या उपयोगी पडतो. 

जिप्समचा वापर करतांना हे विसरू नका - जिप्समचा वापर करण्यापूर्वी माती परीक्षण करून जमिनीचा सामू किती आहे त्यानुसार जिप्सम ची मात्रा ठरवावी. साधारणपणे ८ पेक्षा जास्त सामू असेलेल्या जमिनीमध्ये इतर खतांसोबत एकरी ३०० ते ५०० किलो जिप्सम चा वापर करावा. 

कॅल्शियम 
भुईमुगात कॅल्शिअम मुळाद्वारे आणि शेंगांच्या टरफलांद्वारे शोषला जातो. भुईमुगाच्या पिकास विशेषतः शेंगा भरण्याच्या वेळी कॅल्शिअमची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे शेंगा भरल्या जातात. त्या पोचट राहत नाही. आम्लयुक्त जमिनीमध्ये कॅल्शिअमची कमतरता भासते.

कॅल्शियम कमतरेची लक्षणे  
कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे पानाच्या खालच्या बाजूस टिपके दिसून येतात. वाढणाऱ्या शेंगांना गडद तपकिरी रंग येतो. तसेच कधीकधी शेंगा पोचट भरून त्याच्यावर सुरकुतल्या सारख्या रेषा उमटतात. मुळावर गाठी कमी लागतात. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते.  

कॅल्शियमचा वापर 
कॅल्शिअम २० सेंटिमीटर खोलीवर टाकल्यास शेंगा ५ ते ८ सेंटीमीटर खोलीत वाढतात. अन्यथा त्या १० सेंटिमीटरपेक्षा खोल लागतात. 

गंधक ( सल्फर)
• ज्या जमिनीमध्ये उपलब्ध गंधकाचे प्रमाण १० पीपीएमपेक्षा कमी असते, तेथे त्याची कमतरता भासते.
• गंधकाच्या कमतरतेमुळे नवीन पानाचा रंग फिक्कट हिरवा दिसतो. कोवळी आणि मधली पाणी पिवळी पडू लागतात.  
• अतिशय कमतरता असल्यास पाने कागदासारखी पातळ होतात. उष्ण कटिबंधातील बहुतेक जमिनीमध्ये गंधकाची कमतरता आढळते. नत्र आणि स्फुरद यापैकी काही खतांमध्ये गंधकाचे प्रमाण असते.  
• गंधकामुळे भुईमुगाच्या मुळावरील गाठींचे प्रमाण वाढते. पानांचा आकार वाढून प्रत सुधारते. भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन वाढते. शेंगातील तेलाचे प्रमाण वाढते आणि दाण्यातील प्रथिनांचे प्रमाणही वाढते. तसेच रोगांचे प्रमाण कमी होते. 

जिप्समचे इतर काही फायदे
 • जमिनीची सुपीकता वाढून ती भुसभुशीत होते.  
• क्षारपड जमीन जिप्समच्या वापरामुळे सुधारते.  
• बियाण्याची उगवण क्षमता जिप्सममुळे वाढते.  
• जिप्सममुळे पाण्यातील क्षारांचा निचरा होण्यास मदत होते.  
• सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात.  
• पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते.  
• फळांची, पिकांची गुणवत्ता सुधारते.  
• जमिनीत वाढणाऱ्या पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे.  
• जमिनीतील हुमणीचे नियंत्रण होते.  
• पीक वातावरणातील जास्त तापमानाचा ताण सहन करू शकते.

लेखक
प्रा. संजय बाबासाहेब बडे 
सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग 
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर

हेही वाचा - आरोग्यासाठी फायद्याचे मात्र आता होत आहे दुर्मिळ; जाणून घ्या कोणते आहेत हे भरडधान्य

Web Title: The use of 'this' fertilizer will increase the amount of oil in the groundnut along with good growth of the crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.