Join us

विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून करा हा सोपा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:21 PM

दिवसेंदीवस अनियमित पावसामुळे पाण्याची उपलब्धता कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे पाण्याची उपलब्धता व्यवस्थित असेल तर पीक उत्पादनाचे नियोजन करणे सोपे जाते. म्हणून कुपनलिकेद्वारे पुनर्भरण कसे करता येईल ते आपण आज पाहू.

महाराष्ट्रात बऱ्याच तालुक्यात सध्या दुष्काळाचे सावट आहे. शेतकऱ्यांना त्याची चाहूल चांगलीच जाणवत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी भूजल पुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे आहे. 

दिवसेंदीवस अनियमित पावसामुळे पाण्याची उपलब्धता कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे पाण्याची उपलब्धता व्यवस्थित असेल तर पीक उत्पादनाचे नियोजन करणे सोपे जाते. म्हणून कुपनलिकेद्वारे पुनर्भरण कसे करता येईल ते आपण आज पाहू.

पूर्वी गाव शिवारात विहिरींची संख्या जास्त होती आणि विहिरींचे खोली साधारणता ४५ ते ५० फुटापर्यंत असायची. त्यावेळी पावसाचे पाणी झिरपून पाण्याची पातळी व्यवस्थित राहत होती व उन्हाळ्यातही पाणी पातळी चांगली असायची.

परंतु त्यानंतर कुपनलिका खोदण्याचे प्रमाण वाढत गेली या कुपनलिकांची खोली शंभर पासून अडीचशे व त्यापेक्षा जास्त होत गेली तर महाराष्ट्र काही ठिकाणी ४०० ते ५०० फुटापर्यंत सुद्धा कुपनलिका खोल केली जाते. पर्यायाने पाण्याची पातळी हळूहळू खोल होत गेली आहे.

त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये उन्हाळी पिकांना पाण्याची टंचाई जाणवत आहे. तसेच काही ठिकाणी जास्त पाऊस पडूनही पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते, पावसाच्या पाण्याचा वापर कुपनलिका पुनर्भरणासाठी करू शकतो.

अधिक वाचा: खोडवा ऊस उत्पादन वाढीसाठी पाचट व्यवस्थापन कसे कराल?

असा करा प्रयोग• कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे किंवा घराजवळ कूपनलिका असेल तर पत्र्याचे किया घराच्या छतावरून पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे एक करून कुपनलिका जवळ आणून सोडावे.• कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा.• खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाईपच्या भागात एक-दोन सें. मी. अंतरावर सर्व बाजूंनी चार-पाच मिलि. व्यासाची छिद्रे पाडावीत, या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.• खड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वात खालच्या भागात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी, नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.• अशा प्रकारे छताचे, ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.• पुनर्भरण हे शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन करावे जेणेकरून तेथील शिवारातील सर्वांचीच पाणी पातळी वाढण्यास मदत होईल.

महेश रुपनवरआत्मा तंत्रज्ञान व्यवस्थापक, दौंड

 

टॅग्स :पाणीशेतीशेतकरीदुष्काळपाऊसपीकमहाराष्ट्र