Join us

सोयाबीन उत्पादनवाढीसाठी आल्या ह्या नव्या शिफारसी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 2:51 PM

प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधुंसाठी एकुण २६ शिफारसी प्रसारित केल्या आहेत.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारे प्रसारित वरील नवीन सोयाबीन वाण हे बियाणे साखळीमध्ये असून विविध बिजोत्त्पादन संस्था जसे की महाबीज, विद्यापीठ, शेतकरी उत्पादक संघटना/कंपनी/गट, निजी संस्था इ. यांच्याकडे विविध दर्जाचे बियाणे उपलब्ध आहे.

महत्वाच्या शिफारसीप्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधुंसाठी एकुण २६ शिफारसी प्रसारित केल्या आहेत. यापैकी काही महत्वाच्या शिफारसी.• सोयाबीन पिकामध्ये अधिक उत्पादन, आर्थिक मिळकत व मुलस्थानी जलसंधारणासाठी पेरणीनंतर अंदाजे ३० दिवसांनी सोयाबीनच्या ३ ओळीनंतर सरी काढावी.• सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कुटाराचे आच्छादन ५ टन प्रति हेक्टरी व पोटॅशियम नायट्रेट १% किंवा मॅग्नेशीयम कार्बोनेट ५% किंवा ग्लिसेरोल ५% या बाष्परोधाकाची फवारणी पिक फुलोऱ्यानंतर १५ दिवसांनी करावी.• सोयाबीन पिकाची अवास्तव कायिक वाढ रोखण्यासाठी तसेच अधिक मिळकतीसाठी वाढ रोधक संजीवके क्लोरोमीक्वाट क्लोराईड १००० पीपीएम (२ मिली प्रती लिटर प्रमाणे) पाण्यात मिसळुन पेरणीनंतर ३०-४० दिवसांनी फवारणी करावी.• सोयाबीन पिकांचे अधिक उत्पादन व मिळकतीसाठी शिफारशीत खताची मात्रा व २ टक्के युरियाची फवारणी (२ किलो युरीया १०० लिटर पाण्यात), पेरणीनंतर ५० ते ७० दिवसांनी करावी किंवा शिफारशीत खतांची मात्रा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी किंवा २ टक्के १९:१९:१९ (नत्र, स्फुरद व पालाश) विद्राव्य खताची फवारणी करावी.• सोयाबीन पिकामध्ये जास्त उत्पादन मिळविण्यासाठी, नायट्रोवेन्झिन २०% ५०० पीपीएम (२.५ मिली/लिटर पाणी) फुलांच्या सुरुवातीच्या टप्प्यावर फवारण्याची शिफारस केली जाते.• सोयाबीन पिकाचे जास्त उत्पादन व आर्थिक उत्पन्नासाठी सोयाबीनची पेरणी ४५ x १० से. मी. अंतरावर करावी.• विदर्भातील मध्यम खोल काळ्या जमिनीत सोयाबीनच्या पीडीकेव्ही येलो गोल्ड, सुवर्णसोया व पीडीकेव्ही अंवा या वाणापासून अधिक उत्पादन व आर्थिक फायद्यासाठी ६२.५ किलो बियाणे प्रती हेक्टरी (कमीतकमी ७० टक्के उगवणशक्तीचे) पेरणी करिता वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.• शेंगावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी पेरणीनंतर ५५ आणि ७५ दिवसांनी कार्बोक्झिन थायरम (३ ग्रॅम/किलो) किंवा कार्बेन्डाझिम+मॅन्कोझेब (२ ग्रॅम/किलो) आणि त्यानंतर ५५ आणि ७५ दिवसांनी थायोफेनेट मिथाइल ०.१% च्या दोन फवारण्या करण्याची शिफारस केली जाते.• सोयाबीनच्या मुळकुज/खोडकुज कॉम्प्लेक्स आणि खोडमाशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी ट्रायफ्लॉक्सिस्ट्रोविन+पेनफ्लुफेन १ ग्रॅम/किलो बियाणे किंवा थायोफेनेट मिथाइल+पायरोक्लोस्ट्रोविन २ मिली/किलो बियाणे या सोबतच थायमिथोक्झाम ६०० एफएस २ मिली/किलो बियाण्याची बीजप्रक्रिया करण्याची शिफारस करण्यात येत आहे.

अधिक वाचा: Pomegranate Variety डाळिंब लागवड करताय.. कोणती जात निवडाल?

टॅग्स :सोयाबीनपीकशेतकरीशेतीविद्यापीठपेरणीकीड व रोग नियंत्रण