एकेकाळी ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्यांना गरिबांची भाकरी समजली जात असे. तर गव्हाच्या चपात्या म्हणजे श्रीमंताचे खाणे म्हटले जाई. पण आता ज्वारीचे पौष्टिक गुणधर्म व आहारातील तिचे फायदे लक्षात आल्याने आता ज्वारीची भाकरी म्हणजे श्रीमंतीचा थाट झाली आहे.
ज्वारीच्या भाकरीत कमी कॅलरीज असतात. पण चपातीत कॅलरीत अधिक असतात. तसेच, भाकरीत कर्बोदकाचे प्रमाणही ८२ टक्के असते. पण, चपातीत ६० ते ६५ टक्के असते. चपाती वजन वाढविते. त्या तुलनेने पचायला हलकी आणि वजन कमी करणारी म्हणून ज्वारीच्या भाकरीकडे पाहिले जाते. तसेच चपातीत ग्लुटेन असल्याने ती रक्तातील साखर व वाढविते. पण भाकरीत ग्लुटेन नसल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.
तसेच, ज्वारीच्या भाकरीत फायबरचे प्रमाणही अधिक असल्याने पचनशक्ती वाढविते. ज्वारीच्या भाकरीत अ, इ आणि झिंक जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणावर असल्याने ज्वारीची भाकरी आरोग्यासाठी फलदायक ठरत आहे. तसेच, ज्वारी शीत गुणधर्माची असली तरीही नाचणीप्रमाणे अतिशीत नसल्याने कुठल्याही हंगामात खाल्ली तरी ती त्रासदायक नसल्याने ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य दिले जात आहे. ज्येष्ठांसाठीही ज्वारी उपयुक्त आहे.
ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट
ज्वारीत फायबरचे प्रमाण अधिक आहे. तसेच कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्याने वजन वाढीचा धोका नाही. पचायला हलकी कुठल्याही ऋतुत आहारात फलदायी असल्याने आता चपातीऐवजी ज्वारीच्या भाकरीला श्रीमंतीचा थाट मिळाला आहे.
हॉटेलातही भाकरीलाच डिमांड
सध्या हॉटेलमध्ये जाणारे चपातीऐवजी ज्वारीच्या भाकरीची मागणी करू लागले आहे. ज्येष्ठांच्या आहारात तर भाकरीलाच अधिक प्राधान्य दिले जात आहे.
ज्वारीत फायबरचे प्रमाण जास्त
सुलभ पचनक्रियेसाठी तृणधान्ये, भाज्या, फळे अशा तंतूमय किवा फायबरयुक्त आहाराची गरज असते. ज्वारीत फायबर अधिक असतात. त्यामुळे पचनक्रिया सुलभ होते.
पचनशक्ती सुधारते, वजन उतरते
ज्वारीत कॅलरीज कमी असतात. तसेच, कर्बोदकांचे प्रमाणही कमी असते. फायबरचे प्रमाणही अधिक असल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच वजन नियंत्रणात राहाण्यास मदत होते.
ज्वारी आहारात का फलदायी आहे?
• ज्वारीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि क्षारांमुळे रक्तदाब नियंत्रणात राहातो. अ, इ आणि झिंकाचेही मुबलक प्रमाण. फायबर असल्याने पचनाला सुलभ.
• ज्वारी शीत गुणधर्मचाची असून लोहाचे प्रमाणही अधिक आहे. पचायला हलकी असून कुठल्याही ऋतुत खाल्ल्यास त्रास होत नाही.
ज्वारीच्या भाकरीत कॅलरी कंपाऊंड कमी असतात. तर फायबर जास्त असल्याने पचनासाठी हलकी आहे. चपातीप्रमाणे ज्वारीमध्ये ग्लुटेन पदार्थ नसतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कार्बोहायड्रेटसही अधिक प्रमाणात असतात. ज्वारीच्या भाकरीतून ए, ई आणि झिंक व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामुळे कुठल्याही ऋतुत खाण्यासाठी आरोग्यदायी आहे.
अधिक वाचा: या आहेत टॉप फाईव्ह रानभाज्या ज्या आहेत सर्वगुणसंपन्न