फणसाप्रमाणे कोकणात जांभळाचेही चांगले उत्पादन होते. जांभळाच्या निवडक वाणापासून तयार केलेली कलमे किंवा बहुबीजांकृत मातृवृक्षांपासून तयार केलेली रोपे लावावीत, जांभळाच्या टपोऱ्या फळांना खाण्यासाठी व प्रक्रिया केलेले पदार्थ आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
औषधी गुणधर्म- जांभळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.- या फळाची चव गोड, तुरट असते.- आयुर्वेदानुसार जांभळामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.- मधुमेह नियंत्रणासाठी ते फायदेशीर मानले जाते.- पचन सुधारण्यासाठी आणि मुतखड्यावर उपचार करण्यासाठी बेरी खूप फायदेशीर मानल्या जातात.- बेरीमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेटस भरपूर प्रमाणात असतात.- फळ, साल, बियासुद्धा फायदेशीर आहेत.
लागवडीसाठी जात- कोकण कृषी विद्यापीठाने २००४ मध्ये 'कोकण बहडोली' नावाची अधिक उत्पन्न व मोठी फळे देणारी जांभळाची जात कोकणात लागवडीसाठी शिफारस केली आहे.- या जातीची फळे मोठी (वजन २३.४ ग्रॅम) आणि बियांचे वजन कमी (३.१ ग्रॅम) आहे. }- फळांचा रंग गर्द जांभळा आहे.- ही चार दिवस टिकतात.- वीस वर्षांच्या झाडापासून ५० किलो फळांचे उत्पन्न मिळते.
लागवड कशी करावी?जांभळाची लागवड १० मीटर बाय १० मीटर अंतरावर ९० सेंटीमीटर बाय ९० सेंटीमीटर बाय ९० सेंटीमीटर आकाराचे खड्डे खणून करावी. हे खड्डे माती, २ घमेली चांगले कुजलेले शेणखत, १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिश्रणाने एप्रिल व मे महिन्यात करावी.
खत व्यवस्थापनलागवड केलेल्या झाडाला एक घमेले कुजलेले शेणखत पावसाळ्याच्या सुरुवातीला दरवर्षी द्यावे. पूर्ण वाढलेल्या जांभळाच्या झाडाला पाचव्या वर्षापासून पाच घमेली शेणखत, एक किलो युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट व ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
पाणी आणि इतर कामेझाडांची भटक्या जनावरांपासून काळजी घ्यावी. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे प्रत्येक कलमाला आठवड्यातून एकवेळ २० लिटर पाणी द्यावे. 'कोकण बहडोली' जातीच्या झाडापासून अधिक उत्पादन मिळण्यासाठी ५० टक्के तृतीय फांद्यांवर (१ ते २ इंच जाडीच्या) चाकूच्या सहाय्याने गोलकाप (गर्डलिंग) ऑक्टोबर महिन्यामध्ये द्यावा. योग्य नीगा राखल्यास सात ते आठव्या वर्षापासून उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते.
उत्पादनपूर्ण वाढलेल्या १५ वर्षाच्या झाडापासून सरासरी ५० ते १०० किलो फळे मिळतात.
काढणीजांभळाची फळे पूर्ण जांभळा रंग आल्यावर झाडावर चढून काढावीत.
प्रक्रियेसाठी संधीजांभळापासून सरबत, स्कर्वेश, सिरप, जॅम तर बियांपासून भुकटी तयार करण्यात येते. भारतीय अन्न सुरक्षा व मानदे अधिकार अन्वये अधिकृत परवाना घेऊन फळप्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. तयार फळांना दर मिळत नाही मात्र, विविध उत्पादने तयार केली तर त्यांना मात्र चांगला दर मिळतो.
अधिक वाचा: Kokum Cultivation आरोग्यदायी 'कोकम' पिकाची लागवड कशी केली जाते?