Lokmat Agro >स्मार्ट शेती > Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट

Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट

This information on your Aadhaar card can now be updated from your mobile at home | Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट

Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवरील ही माहिती आता घरबसल्या करता येईल मोबाईलवरून अपडेट

देशाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती अचूक राहावी यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी नागरिकांना सातत्याने आधार कार्डावरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते.

देशाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती अचूक राहावी यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी नागरिकांना सातत्याने आधार कार्डावरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते.

शेअर :

Join us
Join usNext

देशाची लोकसंख्याशास्त्रीय माहिती अचूक राहावी यासाठी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी नागरिकांना सातत्याने आधार कार्डावरील माहिती अपडेट करण्यासाठी आग्रह करत असते. तुमचे ओळखपत्र, पुराव्याचा पत्ता आदी माहिती अपलोड करावी लागते.

स्टेटस ऑनलाईन कसे पाहावे?
ओळखपत्र तसेच पत्ता यांत बदलासाठी केलेल्या विनंतीनुसार चेंज रिक्वेस्ट क्रमांक (यूआरएन) तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एसएमएसने पाठविला जातो. हा यूआरएन क्रमांक आणि आधार नंबर याच्या आधारे तुमच्या विनंतीची स्थिती पुढील पोर्टलवर पाहता येते. https://myaadhaar.uidai.gov.in/CheckAadhaarStatus/en

कागदपत्रे ऑनलाईन अपलोड कशी करावीत?
सर्व प्रथम, UIDAI https://uidai.gov.in/ च्या वेबसाईटवर लॉग इन करा. आधार नंबर टाकताच रजिस्टर मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल.
तुमचा दिसणारा फोटो आणि पत्ता तपासून पाहा.
तुमचा तपशील बरोबर असेल तर, 'मी पडताळणी करीत आहे की वरील माहिती बरोबर आहे, या टॅबवर क्लिक करावे.
दिसणारा तपशील चुकीचा असेल ड्रॉप डाऊन मेन्यूमधून अपलोड करावयाच्या कागदपत्रांवर क्लिक करा.
ओळख पुरावा कागदपत्र अपलोड करा. फाईल साइज २ एमबीपेक्षा मोठी असू नये. फाईल जेपीईजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमधील असावी.
पत्त्यासंबंधी पुरावा कागदपत्र अपलोड करा. (फाईल साइज २ एमबीपेक्षा मोठी असू नये. फाईल जेपीईजी, पीएनजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमधील असावी.)
तुमची याला संमती असल्याचे सबमिट करावे.

बदल कुणी, कधी करावा?
१) तुमच्या जीवनात होणारे मोठे बदल जसे लग्न आणि त्यानंतर नाव आणि पत्ता यांत होणारा बदल ही माहिती नोंदविण्यासाठी बदल करून घ्यावा.
२) काही कारणास्तव नव्या ठिकाणी राहण्यास गेले वा नवे घराची खरेदी केली असल्यास बदल करावा.
३) बदललेला मोबाइल नंबर, इ-मेल आयडी आदी नोंदवण्यासाठी बदल करावा.

Web Title: This information on your Aadhaar card can now be updated from your mobile at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.