Join us

बारमाही उत्पादनासाठी हे आहे फायदेशीर भाजीपाला पिक; कशी कराल लागवड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:04 IST

bhendi lagwad भेंडी हे निर्यातक्षम पिक आहे. युरोप तसेच आखाती देशात याची निर्यात होते. जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन घेतल्यास याची निर्यात करणे शक्य आहे.

भेंडी हे निर्यातक्षम पिक आहे. युरोप तसेच आखाती देशात याची निर्यात होते. जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन घेतल्यास याची निर्यात करणे शक्य आहे.

महाराष्ट्रात भेंडीची खरीप व उन्हाळी हंगामात लागवड केली जाते. उन्हाळी हंगामात बहुतांश ठिकाणी पाणी टंचाईमुळे लागवड होत नाही व एकूणच भेंडीची आवक कमी व मागणी जास्त असल्याने चांगला बाजारभाव मिळतो.

आवश्यक हवामान व जमीनभेंडीच्या पिकासाठी उष्ण हवामान हलक्या जमिनीपासून ते काळ्या जमिनीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये पुरेसे सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत या पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यातून पाण्याचा निचरा होणे आवश्यक असते.

लागवड कालावधीभेंडीची लागवड खरीप हंगामात जून जुलैमध्ये, तर उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी, तर रब्बी हंगामात ऑक्टोबरमध्ये करावी. बारमाही उत्पादनासाठी भेंडी पीक फायदेशीर असून, टप्प्याटप्प्याने लागवड करता येते.

विविध जातीडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे अधिक उत्पादनासाठी भेंडीच्या काही सुधारीत जातींची शिफारस करण्यात आली आहे. त्यामध्ये कोकण भेंडी, परभणी क्रांती, अर्मा अनामिका, अर्का अभय, पंजाब-७, विजया, वर्षा उपहार, परभणी भेंडी, फुले विमुक्ता या सुधारीत जातींची शिफारस केली आहे.

बीजप्रक्रिया व लागवड● खरिपात हेक्टरी आठ ते दहा किलो बियाणे पुरेसे होते. बी रूजत घालण्यापूर्वी पाण्यात किवा सायकोसीलच्या (१०० मि.ली. प्रतिलिटर) दावणात २४ तास भिजवावे. नंतर बियाणे काढून सावलीत कोरडे करून पेरावे, यामुळे उत्पन्न १० ते १५ टक्के वाढते.● कोकणात खरीप हंगामात भेंडीची लागवड ६० बाय ६० सेंटीमीटर अंतरावर करावी.● उन्हाळ्यात ४५ बाय १५ सेंटीमीटर अंतरावर करावी, त्यासाठी हेक्टरी २५ ते २० किलो बियाणे वापरावे.

खत व्यवस्थापनभेंडीच्या पिकाला हेक्टरी १५ टन शेणखत, १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, व २५ किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी संपूर्ण स्फूरद, पालाश व एक तृतीयांश नत्र यांची मात्रा द्यावी. उरलेले दोन तृतीयांश नत्र सम प्रमाणात लागवडीनंतर ३० ते ६० दिवसांनी द्यावे.

आंतरमशागतदोन ते तीन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यावेळी खुरपणी करून तण काढावे. साधारणतः दोन ते तीन खुरपण्या कराव्या लागतात. तणनाशकाचा वापर करूनही तणांचे नियंत्रण करता येते. तणनाशकांची फवारणी पेरणीपूर्वी जमिनीत चांगला ओलावा असताना करावी, फवारणीनंतर सात दिवसांनी भेंडीची लागवड कारवी.

काढणीभेंडीची काढणी फळे कोवळी असताना करावी. झाडास फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून ६ ते ७ दिवसात फळे काढणीसाठी तयार होतात. जातीपरत्वे १०० ते १२० क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते. भेंडी या भाजीला बारमाही मागणी आहे.

अधिक वाचा: Sendriya Carbon : मातीतील सेंद्रिय कर्ब कशामुळे कमी होतो? व तो कसा वाढवावा; सविस्तर पाहूया

टॅग्स :भाज्यालागवड, मशागतशेतीपीकपेरणीशेतकरीखरीपरब्बी