Join us

भात पिकात खतं देण्याचं हे आहे सोपे तंत्र वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 4:00 PM

दिवसेंदिवस निविष्ठांच्या वाढत्या किंमती मजुरीवरील वाढता खर्च यांचा विचार करता भात शेती फायद्यात आणण्यासाठी योग्य तांत्रिक बार्बीचा वापर करून उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. भात पिकात खत देण्याची सोपी पद्धत म्हणजे ब्रिकेट स्वरुपात खते देणे.

भात शेतीमधील अपार कष्ट आणि लागवडीसाठी लागणारे जास्त मजूर यांचा विचार करून शेतकरी स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीची निवड करीत असतो. भात लागवडीच्या विविध ठिकाणी वेगवगळ्या पद्धती जरी अवलंबल्या जात असल्या तरी पारंपारीक पद्धतीने पुर्नलागवड पद्धत ही बहुतांश शेतकरी करताना दिसतात.

मात्र त्यामध्ये दोष असल्याने उत्पादन कमी येते. यामध्ये रोपांची संख्या नियंत्रीत राखणे, अन्नद्रव्ये योग्य व पुरेशा प्रमाणात देणे, लागवडीचे अंतर, पिकांच्या अवशेषांचा व हिरवळीच्या खताचा वापर यासारख्या तांत्रिक बाबींचा अभाव असल्याने उत्पादन कमी येते.

दिवसेंदिवस निविष्ठांच्या वाढत्या किंमती मजुरीवरील वाढता खर्च यांचा विचार करता भात शेती फायद्यात आणण्यासाठी योग्य तांत्रिक बार्बीचा वापर करून उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. भात पिकात खत देण्याची सोपी पद्धत म्हणजे ब्रिकेट स्वरुपात खते देणे.

युरिया डिएपी ब्रिकेट स्वरूपात रासायनिक खतांचा वापर• युरिया आणि डिएपी या दोन खतांचे एकत्रित मिश्रण करून त्याची गोळी तयार करता येते. त्यासाठी ६० किलो युरिया आणि ४० किलो डिएपी हे खत वापरून ब्रिकेंटींग मशीनच्या सहाय्याने गोळ्या तयार करता येतील.• ब्रिकेटरमधून तयार केलेली २.७ ग्रॅम वजनाची डिएपीयुक्त युरिया ब्रिकेट चौथ्या सुत्रानुसार वापरल्यास प्रति हेक्टर ५९ किलो नत्र व ३१ किलो स्फूरद दिला जातो.• याशिवाय डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठीने यावर अधिक संशोधन करून युरिया-सुफला आणि कोकण अन्नपूर्णा या मुल्यवर्धित ब्रिकेटस् तयार केलेल्या आहेत. या दोन्ही ब्रिकेटमध्ये पालाश हा घटक मिळत असल्याने भात पिकापासून अधिक उत्पन्न मिळते.• युरिया-सुफला ब्रिकेटसाठी युरिया आणि सुफला (१५: १५: १५) ही खते १.५: १ या प्रमाणात वापरून ब्रिकेटरच्या सहाय्याने गोळ्या तयार करण्याच्या तंत्रज्ञानाची शिफारस केलेली आहे. या खतांच्या गोळ्यातून भात पिकाला हेक्टरी ५७ किलो नत्र, १० किलो स्फुरद आणि १० किलो पालाश पुरविला जातो.• कोकण अन्नपूर्णा ब्रिकेट तयार करण्यासाठी युरिया ६० टक्के आणि गोदावरी खत (१४:३५:१४) यांच्या मिश्रणाची गोळी तयार होते. या गोळ्यातून भात पिकाला हेक्टरी ५६ किलो नत्र, २४ किलो स्फुरद आणि १० किलो पालाशचा पुरवठा होतो.• या ब्रिकेटस्मध्ये मुल्यवर्धन करताना सिलीकॉन आणि झिंक या अन्नद्रव्यांचा समावेश करता येतो. अशा ब्रिकेटस्मधून ३४ टक्के नत्र, १४ टक्के स्फुरद, ६ टक्के पालाश, ०.४४ टक्के सिलीकॉन आणि १.२३ टक्के झिंक पुरविला जातो.• तिसऱ्या सुत्रानुसार सुधारित भाताची नियंत्रित लावणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा लावणीच्या दूसऱ्या दिवशी ब्रिकेट खताच्या गोळ्या पिकास द्याव्यात.• २०० ते ४०० ग्रॅम ब्रिकेट खताच्या गोळ्या शेतकऱ्यांनी कमरेभोवती बांधलेल्या प्लास्टीक पिशवीत घ्याव्यात. कोणत्याही एका कोरड्या हाताने पिशवीतून एक वेळेस ५ ते ६ ब्रिकेट काढाव्यात आणि दूसऱ्या हातात एका वेळी एक ब्रिकेट टाकावी.• त्यानंतर प्रत्येक चार आव्याच्या (१५ सेंमी x १५ सेंमी चौरसात) मध्यभागी एक ब्रिकेट हातानी ७ ते १० सेंमी खोलीवर खोचावे.• एका हेक्टरमध्ये ६२,५०० ब्रिकेटस् खोचाव्या लागतात. म्हणजेच प्रति ब्रिकेटचे वजन २.७ ग्रॅम प्रमाणे हेक्टरी एकूण १७० किलो ब्रिकेट पुरेशा होतात.• नियंत्रित लावणीनंतर हाताने ब्रिकेट खोचण्याची क्रिया खूप सोपी होते व जलद करता येते. कारण ब्रिकेट खोचणारा कामगार २५ सेंमी चालण्याच्या मार्गातून जलदपणे चालू शकतो.• तसेच तो ब्रिकेट खोचण्याच्या जागा (१५ सेंमी x १५ सेंमी आकाराचे चार आव्यांचे चौरस) सहजासहजी ओळखू शकतो. त्यामुळे ब्रिकेट खोचण्याच्या जागा शोधण्यात त्या कामगाराचा वेळ वाया जात नाही.

अधिक वाचा: भात पेंढ्यातील पालाश व सिलीकॉन या अन्नद्रव्यांचा फेरवापर कसा करावा?

टॅग्स :भातसेंद्रिय खतखतेपीकशेतकरीशेती