Join us

वेळीच करा आंबा मोहारावरील किडींपासून संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 2:02 PM

सद्यपरिस्थितीत ढगाळ वातावरण, थंडी, ऊन व पाऊस असा वातावरणाचा क्रम चालू आहे व तसेच आंब्याला मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहरावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणाम स्वरूप मोहोराची गळ होते.

सद्यपरिस्थितीत ढगाळ वातावरण, थंडी, ऊन व पाऊस असा वातावरणाचा क्रम चालू आहे व तसेच आंब्याला मोहोर येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या अवस्थेत आंब्यावरील मोहरावर किडींचा व रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. परिणाम स्वरूप मोहोराची गळ होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच मोहोराची काळजी घेवून त्यावर येणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव येण्यास अटकाव करण्याची गरज असते. आंब्याच्या मोहरावर रसशोषक किडीमध्ये तुडतुडे, फुलकिडे व कोळी या प्रमुख नुकसानकारक किडी आहेत.

तुडतुडेतुडतुडे व त्याची पिल्ले अवस्था आंब्याची कोवळी पाने, मोहोर व अगदी लहान कोवळ्या फळातील रस शोषण करतात. त्यामुळे मोहरातील फुले सुकतात व फळधारनेपुर्वीच गळून पडतात, त्याचप्रमाणे या किडीद्वारे होत असलेल्या रस शोषणामुळे लहान फळे सुद्धा गळून पडतात. तुडतुडे मधासारखा चिकट गोड पदार्थ शरीरातून बाहेर टाकतात. तो खालच्या पानावर पडतो व उष्ण व दमट हवामानामुळे त्यावर काळसर रंगाच्या बुरशीची वाढ होते त्यामुळे अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण येतो.

फुलकिडेपिल्ले व प्रौढ फुलकिडे पानाची साल खरवडून पानातील रस शोषतात. पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. अधिक प्रादुर्भावामध्ये पानगळ होऊन शेंडे शिल्लक राहतात. कोवळ्या फळांवरील साल खरवडल्यामुळे काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते.

कोळीलाल रंगाचे आकाराने अतिशय लहान कोळी उघड्या डोळ्यांना सहजासहजी दिसत नाहीत. पानांमागे त्यांनी बनवलेली बारीक जाळी दिसतात. जाळीखाली राहून पानातील रस शोषतात. पाने तेलकट, तांबूस होऊन अर्धवट वाळतात. नंतर भरपूर पानगळ होते. त्यामुळे या रसशोषण किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

आंबा मोहराचे तुडतुडे, फुलकिडी व कोळी या किडींपासून संरक्षण करण्याचे दृष्टीने झाडावर बहार येण्याच्या सुरूवातीच्या काळापासून योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आंबा मोहराची नियमित पाहणी करून वेळोवेळी निरीक्षण घेणे आवश्यक आहे. रसशोषण करणारे किडींवर उपजीविका करणारे मित्र किटक यांची संख्या विपुल प्रमाणात आढळल्यास रासायनिक किटकनाशकांची फवारणी टाळता येवू शकते.

अधिक वाचा: उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच

मोहोरावर तुडतुडे याचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास व रासायनिक किटकनाशकांच्या फवारणीची फारच आवश्यकता असेल अशा परिस्थितीत नियंत्रणासाठी खालील पैकी कोणत्याही एका किटकनाशकाचा वापर प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.१) बुप्रोफेझीन २५ टक्के प्रवाही १० मि.ली. किंवा२) डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही ५ मि.ली. किंवा३) इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ४ मि.ली. किंवा४) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ५ मि.ली. किंवा५) डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १६.५ मि.ली.

आंबा बागेत फळमाशीच्या उपद्रवामुळे होणारी फळगळ थांबविण्यासाठी बागेत मिथाईल युजेनॉल या संश्लेकाचा उपयोग करण्यात आलेली फळमाशी सापळे लावण्यास बऱ्याच प्रमाणात फळगळ नियंत्रण करण्यास मदत होते.

डॉ. अजय सदावर्ते, डॉ. धनराज उंदिरवाडे व डॉ. निशांत उकेकिटकशास्त्र विभाग, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

टॅग्स :आंबाकीड व रोग नियंत्रणकोकण