शेतकरी ऊस पिकाची लागवड करून त्यामध्ये रब्बी हंगामात भुईमूग पीक आंतरपीक म्हणून घेतात. सध्या हे आंतरपीक शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत आहे. एकाचवेळी दोन पिकांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी उसात भुईमुगाची लागवड केली आहे.
सोयाबीन, भात तसेच रताळी पिके घेऊन शेतकरी दुय्यम पिकासाठी उसाची लागवड करतात. तसेच पिकामध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग, कांदा, लसूण तसेच इतर पालेभाज्या घेतल्या जातात. त्या आंतरपिकांना योग्यवेळी पाणीपुरवठा, खताचा पुरवठा, औषधी फवारणी केली जाते. त्यामुळे उसातील भुईमुगासह इतर पिके शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरत असल्याचे दिसून येत आहे.
अधिक वाचा: विक्रमी उत्पादनासाठी सुरु उसाच्या लागवडीचे व्यवस्थापन कसे कराल?
अनेक शेतकरी अल्पभूधारक असल्याने शेतकऱ्यांना कमी जमिनीमध्ये आंतरपीक म्हणून अशी पिके घेणे गरजेचे असते. कमी कष्टामध्ये तसेच कमी खर्चामध्ये आंतरपिके फायदेशीर ठरत आहेत. शेतकरी आंतरपिकांमध्ये पालेभाज्यांचेही उत्पादन घेतात. पालेभाज्यांची बाजारपेठेत विक्री करून त्यामध्ये आपला दैनंदिन खर्च, उदरनिर्वाह भागवतात.