Join us

Tomato Crop Management : टोमॅटोवरील मावा, पांढरी माशी या किडीचे नियंत्रण करण्यासाठी करा 'हे' उपाय

By रविंद्र जाधव | Updated: January 9, 2025 19:28 IST

Management of Mayfly and Whitefly on Tomato : शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची शेती करतात. टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन करत असताना या पिकावर पांढरी माशी, मावा, फुलकिडे, लाल कोळी आधीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची शेती करतात. टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन करत असताना या पिकावर पांढरी माशी, मावा, फुलकिडे, लाल कोळी आधीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

ज्याचे नियंत्रण करण्यासाठी परिस्थितीनुसार उत्पादकाला मोठ्या प्रमाणात आर्थिक भारदेखील सोसावा लागतो. याच अनुषंगाने आज आपण बघणार आहोत टोमॅटो पिकावरील पांढरी माशी, मावा, फुलकिडे, लाल कोळींचे नियंत्रण कसे करावे. 

एकात्मिक व्यवस्थापन

• रोपाची लागवड करतेवेळी इमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल हे कीटकनाशक ३ मिली / १० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपाच्या मुळा बुडवून लागवड करावी.

• रोपाची लागवड झाल्या नंतर ८ ते १० दिवसानी क्लॉरेंनट्रानीलीप्रोल ८.८ % + थायमिथॉक्झाम १८.५% एससी ५०० मिली प्रति हेक्टरी आळवणी करावी.

• झाडातील अंतर योग्य असावे.

• शिफारशीनुसार खताचा वापर करावा. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर टाळावा.

• प्रादुर्भावग्रस्त फळे, पाने, फांद्या तोडून नष्ट करावी.

• विषाणूजन्य रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत.

कीडकीटकनाशकमात्रा / १० लि.पाणी
पांढरी माशी, मावा, फुलकिडे

थायमिथॉक्झाम १२.६ % + लॅमडा साहॅलोथ्रीन 9.5% झेडसी

स्पायरोमेसीफेन २२.५ एससी

थायमिथॉक्झाम २५ डब्ल्युजी

२.५  मिली

१२.२ मिली

४ ग्रॅम

लाल कोळी

प्रोप्रागाइट १० % + बायफेंथ्रिन ५ % एसइ

स्पायरोमेसीफेन २२.९ एससी

२२ मिली

१२.२ मिली

स्त्रोत : पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप), किटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी. 

हेही वाचा : न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक

टॅग्स :टोमॅटोकीड व रोग नियंत्रणपीक व्यवस्थापनशेतकरीशेतीशेती क्षेत्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ