Lokmat Agro >स्मार्ट शेती > Tur Karpa : तूर पिकातील खोडावरील करपा रोगाचे कसे कराल व्यवस्थापन

Tur Karpa : तूर पिकातील खोडावरील करपा रोगाचे कसे कराल व्यवस्थापन

Tur Karpa : How to manage stem blight disease in tur pigeon pea crop | Tur Karpa : तूर पिकातील खोडावरील करपा रोगाचे कसे कराल व्यवस्थापन

Tur Karpa : तूर पिकातील खोडावरील करपा रोगाचे कसे कराल व्यवस्थापन

महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे.

अ) कोलेटोट्रायकम करपा हा रोग कोलेटोट्रायकम डिमॅशियम या बुरशीमुळे होतो.
ब) फायटोप्थोरा करपा हा रोग फायटोप्थोरा ड्रेसलेरा या बुरशीमुळे होतो.

लक्षणे
- कोलेटोट्रायकम करपा रोगात खोडावर, फांद्यावर काळ्या करड्या रंगाचे चट्टे आढळतात.
- रोगाची तीव्रता अधिक असल्यास फांद्या व झाडे वाळतात.
- फायटोप्थोरा करपा या रोगामुळे पानावर ओलसर चट्टे तसेच खोडावर तपकिरी चट्टे जमिनीलगत किंवा जमिनीपासून काही इंच अंतरावर आढळतात.
- नंतर हे चट्टे वाढत जाऊन खोडा सभोवती खोलगट भाग तयार होतो व काही वेळा खोडावर गाठी सुध्दा तयार होतात.
- या चट्टयांवर अनुकुल वातावरणात पांढरट गुलाबी रंगाची बुरशी वाढलेली दिसून येते.
- हे चट्टे वाढत जाऊन झाडाच्या मुख्य बुंध्याला वेढतात त्यामुळे झाड कमकुवत होऊन त्या ठिकाणी चटकन तुटते.
- या खोडाच्या चट्टयांचा उभा छेद घेतल्यास खोडाचा आतील भाग तपकिरी काळा पडल्याचे दिसते.
- बरेचदा खोडावर २ ते ३ मिली मीटर खोल व २ ते ४ सेंटीमीटर लांब भेगा पडलेल्या दिसतात.

प्रसार
सततचा रिमझिम पाऊस पडत राहिल्यास या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. ८० ते ८५ टक्के वातावरणातील आर्द्रता व २२ ते २५ अंश तापमान या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरते. पाण्यातून व हवेद्वारे या रोगाच्या बिजाणूंचा प्रसार होतो.

नियंत्रणाचे उपाय
१) पेरणी करताना सरी वरंबा पद्धतीचा अवलंब करावा.
२) पाणी साचणाऱ्या व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत तूरचे पीक घेऊ नये.
३) बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिम ३७.५ + थायरम ३७.५ टक्के डब्लू. एस. या मिश्र बुरशीनाशकाची ४ ग्रॅम त्यानंतर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.
४) पाऊस जास्त पडल्यास शेतात चर खोदून अतिरीक्त पाणी शेताबाहेर काढावे.
५) रोगग्रस्त शेतात ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
६) रोग दिसताच मेटालाक्झील ४ टक्के + मन्कॉझेब ६४ टक्के डब्लू. पी. बुरशीनाशक २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर प्रामुख्याने खोडावर व फांद्यावरही फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास ८ ते १० दिवसांनी पुन्हा फवारणी करावी.

Web Title: Tur Karpa : How to manage stem blight disease in tur pigeon pea crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.