कडधान्य पिकांमध्ये तूर पिकाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय लोकांच्या आहारात कडधान्य पिकांचे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जमिनीची उत्पादकता व पोत कायम राखून अधिक उत्पादन मिळत राहण्यासाठी विविध पीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकांना नव्याने महत्व प्राप्त होत आहे.
तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.
१) बीडीएन - २०१३-४१ (गोदावरी)
कालावधी दिवस : १६५-१७०
उत्पादन क्वि./हे. : २२-२४
वैशिष्ट्ये : पांढरा दाणा, शेंगाच्या वाढीच्या अवस्थेत सिंचन देणे आवश्यक तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक.
२) बी डी एन - ७११
कालावधी दिवस : १५०-१५५
उत्पादन क्वि./हे. : १६-१८
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग पांढरा कमी कालावधीत तयार होणारा तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक.
३) बी एस एम आर - ७३६
कालावधी दिवस : १७५-१८०
उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, लाल दाणा.
४) बी एस एम आर - ८५३ (वैशाली)
कालावधी दिवस : १७५-१८०
उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, लाल दाणा.
५) बी डी एन - ७१६
कालावधी दिवस : १६५-१७०
उत्पादन क्वि./हे. : २०-२२
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, अधिक उत्पादन क्षमता.
६) बी डी एन - २
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १४-१५
वैशिष्ट्ये : पांढरा दाणा, मररोग प्रतिकारक, गुजरात मध्ये लोकप्रिय वाण.
७) बी डी एन - ७०८ (अमोल)
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १४-१७
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिकारक, लाल दाणा कोरडवाहुसाठी योग्य.
८) विपुला
कालावधी दिवस : १४५-१६०
उत्पादन क्वि./हे. : १४-१६
वैशिष्ट्ये : तांबड्या रंगाचा दाणा, मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम.
९) फुले राजेश्वरी
कालावधी दिवस : १४०-१५०
उत्पादन क्वि./हे. : १८-२३
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिकारक, लवकर पक्वता तांबड्या रंगाचे टपोरे दाणे.
१०) ए के टी - ८८११
कालावधी दिवस : १५५-१६५
उत्पादन क्वि./हे. : १५-१६
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग लाल.
११) पी के व्ही तारा
कालावधी दिवस : १७०-१८०
उत्पादन क्वि./हे. : १९-२२
वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग तांबडा.
१२) आयसीपीएल - ८७११९
कालावधी दिवस : १८५-१९०
उत्पादन क्वि./हे. : १५-१६
वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक लाल दाणा.
अधिक वाचा: Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा