Join us

Tur Variety तुरीचे अधिक उत्पादन देणारे लोकप्रिय वाण कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 10:29 AM

Tur Variety तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.

कडधान्य पिकांमध्ये तूर पिकाचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. भारतीय लोकांच्या आहारात कडधान्य पिकांचे अनन्य साधारण महत्व आहे. तसेच जमिनीची उत्पादकता व पोत कायम राखून अधिक उत्पादन मिळत राहण्यासाठी विविध पीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकांना नव्याने महत्व प्राप्त होत आहे.

तुरीच्या अधिक उत्पादनासाठी सुधारीत वाणांची निवड करणे अत्यंत महत्वाचे आहे.

१) बीडीएन - २०१३-४१ (गोदावरी)कालावधी दिवस : १६५-१७०उत्पादन क्वि./हे. : २२-२४वैशिष्ट्ये : पांढरा दाणा, शेंगाच्या वाढीच्या अवस्थेत सिंचन देणे आवश्यक तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक.

२) बी डी एन - ७११कालावधी दिवस : १५०-१५५उत्पादन क्वि./हे. : १६-१८वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग पांढरा कमी कालावधीत तयार होणारा तसेच मर व वांझ रोगास प्रतिकारक.

३) बी एस एम आर - ७३६कालावधी दिवस : १७५-१८०उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, लाल दाणा.

४) बी एस एम आर - ८५३ (वैशाली)कालावधी दिवस : १७५-१८०उत्पादन क्वि./हे. : को. १४-१६, बा. १८-२०वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, लाल दाणा.

५) बी डी एन - ७१६कालावधी दिवस : १६५-१७०उत्पादन क्वि./हे. : २०-२२वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक, अधिक उत्पादन क्षमता.

६) बी डी एन - २कालावधी दिवस : १५५-१६५उत्पादन क्वि./हे. : १४-१५वैशिष्ट्ये : पांढरा दाणा, मररोग प्रतिकारक, गुजरात मध्ये लोकप्रिय वाण.

७) बी डी एन - ७०८ (अमोल)कालावधी दिवस : १५५-१६५उत्पादन क्वि./हे. : १४-१७वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिकारक, लाल दाणा कोरडवाहुसाठी योग्य.

८) विपुलाकालावधी दिवस : १४५-१६०उत्पादन क्वि./हे. : १४-१६वैशिष्ट्ये : तांबड्या रंगाचा दाणा, मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम.

९) फुले राजेश्वरीकालावधी दिवस : १४०-१५०उत्पादन क्वि./हे. : १८-२३वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिकारक, लवकर पक्वता तांबड्या रंगाचे टपोरे दाणे.

१०) ए के टी - ८८११कालावधी दिवस : १५५-१६५उत्पादन क्वि./हे. : १५-१६वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग लाल.

११) पी के व्ही ताराकालावधी दिवस : १७०-१८०उत्पादन क्वि./हे. : १९-२२वैशिष्ट्ये : दाण्याचा रंग तांबडा.

१२) आयसीपीएल - ८७११९कालावधी दिवस : १८५-१९०उत्पादन क्वि./हे. : १५-१६वैशिष्ट्ये : मर व वांझ रोगास प्रतिबंधक लाल दाणा.

अधिक वाचा: Kharif Intercropping खरीप हंगामात या पद्धतीने पेरणी करा मिळेल अधिकचा नफा

टॅग्स :तूरपीकशेतकरीशेतीपेरणीखरीप