पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान करावी. लागवडीकरिता को - ८६०३२ (निरा), को- ९४०१२ (फुले सावित्री), को ८०१४, को.एम. ०२६५ (फुले-२६५), फुले १०००१ या वाणांची शिफारस आहे.
कशी करावी बेणे प्रक्रिया?
१) ऊस बेणे लागवडी पूर्वी १० लिटर पाण्यात डायमेथोएट ३०% प्रवाही २६.३ मि.ली. + १० ग्रॅम कार्बेन्डेझिमची १० मिनिटासाठी बेणे प्रक्रिया करावी. यामुळे बुरशीजन्य रोग व खवले किडीचा बंदोबस्त होतो.
२) हुमणीचा प्रादुर्भाव असल्यास बीजप्रक्रियासाठी इमिडॅक्लोप्रिड ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी वापरुन १० मिनिटे बिजप्रक्रिया करावी.
३) अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक अनुक्रमे १० किलो आणि १.२५ किलो प्रती १०० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ऊसाच्या टिपऱ्या ३० मिनिट बुडवून नंतर लावण करावी. त्यामुळे नत्र खतामध्ये ५०% ची तर स्फुरद खतामध्ये २५% बचत होते.
खत व्यवस्थापन
पूर्व हंगामी ऊस लागणीच्या वेळी ३४ किलो नत्र (७४ किलो युरिया), ८५ किलो स्फुरद (५३१ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ८५ किलो पालाश (१४२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रती हेक्टरी द्यावे.
अधिक वाचा: मका पिकावरील लष्करी अळीसाठी महागडी औषधे न वापरता करा हे कमी खर्चातील उपाय