Join us

Us Lagwad : उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी लागवड तंत्रात करा हे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 10:05 AM

ऊस उत्पादनात वाढ करावयाची असल्यास शास्त्रीयदृष्ट्या आपण लागवड तंत्रात काय बदल करणे आवश्यक आहे ते पाहूया.

आडसाली उसाची लागवड १५ जुलै ते १५ ऑगस्ट, पूर्वहंगामी उसाची १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर आणि सुरु उसाची लागवड १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या तीन हंगामात करावी. १५ फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवणे फायदेशीर ठरते.

ऊस उत्पादन वाढीचे तंत्र

  • जमीन आरोग्य व्यवस्थापन मशागत आणि लेवलींग, माती परिक्षण, क्षारपड जमीन व्यवस्थापन सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर, पिकाची फेरपालट, सबसॉयलिंग करणे
  • सुधारीत जातीच्या शुध्द व निरोगी बेणे/रोपांचा वापर, सुपरकेन नर्सरी, ट्रेमधील रोपांची लागवड, बेणेमळा व्यवस्थापन करणे.
  • बिजप्रक्रिया, ४.५ ते ५ फुट लागवड, बियाण्याचे प्रमाण व रोपांची संख्या, पिक पध्दतीत बदल, आंतरपिकाची निवड करणे.
  • एकात्मिक व सुक्षम अन्नद्रव्य व्यवस्थापन, जिवाणू खतांचा वापर, संजीवकांचा वापर खतांचा स्त्रोत, प्रमाण, वापरण्याची वेळ आणि खते झाकून देण्याची पध्दत यांचा अवलंब करणे.
  • ठिबक सिंचन व फर्टिगेशन, पाण्याचा कार्यक्षम वापर, लांब सरी पध्दत यांचा अवलंब करणे.
  • एकात्मिक तण नियंत्रण, आंतरमशागत व यांत्रिकीकरण करणे.
  • जैविक व अजैविक ताण व्यवस्थापन रोग, किड बंदोबस्त, पूर, पाण्याचा ताण व्यवस्थापन करणे.
  • खोडवा व्यवस्थापन, पाचटाचा वापर इत्यादी.

लक्ष्य एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे१) ऊस जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन.२) सुधारीत जातीच्या शुध्द/निरोगी बेण्याचा वापर.३) पाच फुट सरीमध्ये ऊस/रोप लागवड तंत्रज्ञान.४) अन्नद्रव्य व्यवस्थापन व संजीवकांची फवारणी.५) ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन.६) तण नियंत्रण व आंतरमशागत.७) आपत्कालीन ऊस पीक व्यवस्थापन.

अधिक वाचा: Us Bene Prakriya : पूर्वहंगामी उसाची लागवड करायचीय कशी कराल बेणे प्रक्रिया

टॅग्स :ऊसपीकलागवड, मशागतपीक व्यवस्थापनशेतीखते