कंपोस्ट खत तयार करणे ही एक जीवशास्त्रीय प्रक्रिया असून तिच्यामध्ये व कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्म जेईईव्हीएएनयू मार्फत विघटन होते आणि कर्ब नत्र गुणोत्तर कमी होते.
अशा विघटन झालेल्या कंपोस्ट खतमधून शेण खताच्या तुलनेने अधिक प्रमाणात सेंद्रिय पदार्थ, मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पुरवठा होतो. कंपोस्ट खत हे शेतातील टाकाऊ पदार्थ उदा. पिकांची धसकटे, तन, पिकांचे अवशेष, कापसाचे चिपाड, गोठ्यातील मूत्र शोषून घेतलेली माती इत्यादी पध्दतींचा वापर करून केल्या जाते.
कंपोस्ट खत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी
१) बाष्प
२) तापमान
३) सेंद्रिय पदार्थ
४) कॅल्शियम फॉस्फेटचा वापर
५) कर्ब नत्र गुणोत्तर जीवाणू संवर्धनाचा उपयोग
कंपोस्ट खत तयार करण्यासाठीची ढीग पद्धत
- ढीग पध्दत या पध्दतीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे विघटन हवेच्या सानिध्यात घडवून आणतात.
- या पध्दतीमध्ये सेंद्रिय पदार्थांच्या ढीगांची लांबी २ मिटर पेक्षा जास्त, रूंदी २ ते २.५ मीटर आणि ऊंची सुमारे १.५ मीटर ठेवतात.
- ढीग वरच्या बाजूस निमुळता होत जाणारा रचावा. ढीगाची पृष्ठभागावरील रूंदी पाया पेक्षा २ फुट कमी असावी. ढीग पट्टा पध्दतीने रचावा.
- प्रथम सेमी जाडीचा कर्ब युक्त पदार्थांचा थर व त्यावर नत्र युक्त पदार्थांचा थर या क्रमाने १.५ मीटर उंची होईपर्यंत ढीग रचावा.
- या पध्दतीमध्ये पिकांचे अवशेष, शेण, मुत्रयुक्त माती, राख, पानी यांचा वापर करून खत तयार करावे.
- प्रत्येक थरावर पानी शिंपडावे, पृष्ठ भागावर पावसाचे पाणी धरून ठेवण्यासाठी थोडासा खोलगट भाग करून हा ढीग सर्व बाजूंनी माती व वाळलेले गवत यांनी झाकून टाकावा.
- त्यामुळे आतील उष्णता बाहेर जाणार नाही. २ ते ३ महिन्यानंतर सर्व थरातील पदार्थ पुन्हा खाली वर करून मिसळल्यास विघटन जलद होते.
- सुमारे ४ महिन्यात उत्तम सेंद्रिय खत तयार होते. ही पध्दत जास्त पावसाच्या व पाणथळ भागाममध्ये वापरावी.
- अशा पध्दतीने तयार केलेल्या कंपोस्ट खतामध्ये ०.७७% नत्र, ०.४४ % स्फुरद आणि ०.३८% पालाश असते.
कंपोस्ट खत तयार झाले की नाही हे तपासून घेण्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करावा.
१) उत्तम कुजलेले खत रवेदार होते.
२) उत्तम कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचे आकारमान ६०% कमी होते तर वजन ४० टक्यांनी कमी होते.
३) खताचा रंग तपकिरी व गर्द काळा होतो.
४) खताची विशिष्ट घनता कमी होते.
५) खताचा मातकट वास येतो.
६) खताचे तापमान कमी होते.