सध्याच्या वातावरणीय बदलामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी आणि शेती हा एक चिंतेचा विषय बनला आहे. तसेच भारताने पॅरिस करारा अंतर्गत जागतिक हवामानातील वाढ १.५ ते २ अंशाने कमी करण्याचे ध्येय ठेवले असून त्याच्या साध्यासाठी दोन ते तीन अब्ज टन कार्बन डाय ऑक्साइडचे झाडांमार्फत स्थिरीकरण करायचे आहे.
तसेच सध्याच्या काळामध्ये वनशेती हा शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्याच्या खात्रीबरोबरच वातावरण बदलांच्या आपत्तींचा सामना करण्याची क्षमता ठेवत आहे.
तसेच वनशेती पासून मिळणाऱ्या बहू-उपयोगी गोष्टींमुळे शेतकरी हा वनशेतीकडे वळू लागला आहे, यामध्ये चारा, फळे, भाजीपाला, जळावू लाकूड, जमिनीचा पोत सुधारणे, निकृष्ट व पडिक जमीनींचे व्यवस्थापन, वाऱ्यांपासून होणारे संरक्षण इत्यादींचा समावेश आहे.
या व्यतरिक्त, कागद व प्लायवुड उद्योगांसाठी वनशेती ही एक देणगीच ठरत आहे. वर्तमान परिस्थितीत, वनशेतीला चालना मिळावी यासाठी भारत सरकारने २०१४ मध्ये राष्ट्रीय कृषिनिकी नीती लागू केली आणि याच्या अंतर्गत बहू-उपयोगी वृक्षांना शेती मध्ये लावण्यासाठी प्रसार आणि प्रचार केला जात आहे.
बांधावरती लागवड (Bund plantation)
- या पद्धतीमध्ये बहूउपयोगी वृक्ष व फळ वृक्ष शेताच्या बांधवारती किंवा नाल्याच्या बाजूने ५ ते १० फुट दूर वृक्षांची एका ओळीत/जोड ओळीत किंवा झिग-झॅग प्रकारे लागवड केली जाते.
- यामुळे शेतकऱ्याच्या परिघीय क्षेत्राचा व बांधाचा जास्तीत जास्त उपयोग होऊन अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येतात.
- तसेच या वृक्षांमुळे जमिनीची धूप, बांधबंदिस्ती, वाऱ्यापासून संरक्षण व सावली मिळून आंतरपिकांचे सुद्धा उत्पन्न वाढते.
- बांधावरील लागवडीसाठी साग, सुरू, हादगा, सुबाभुळ, शेवरी, निंबारा, नारळ, आंबा, शेवगा व बोर उपयुक्त ठरतात.
अधिक वाचा: Jaminiche Bakshish Patra : जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? आणि ते का करायचे वाचा सविस्तर