Lokmat Agro >स्मार्ट शेती > Vegetable Crop Management : भाजीपाला पिकावरील विविध कीड व रोगांचे असे करा नियंत्रण

Vegetable Crop Management : भाजीपाला पिकावरील विविध कीड व रोगांचे असे करा नियंत्रण

Vegetable Crop Management: Control of various pest diseases on tomato, brinjal, onion, okra; Crop management advice from agricultural experts | Vegetable Crop Management : भाजीपाला पिकावरील विविध कीड व रोगांचे असे करा नियंत्रण

Vegetable Crop Management : भाजीपाला पिकावरील विविध कीड व रोगांचे असे करा नियंत्रण

सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे त्यातच काही भागात संततधार पाऊस देखील आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे त्यातच काही भागात संततधार पाऊस देखील आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे त्यातच काही भागात संततधार पाऊस देखील आहे. यामुळे भाजीपाला पिकांवर विविध कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

याच अनुषंगाने जाणून घेऊया टोमॅटो, वांगी, भेंडी, कांदा पिकावरील विविध कीड व रोगांचे नियंत्रण कसे करावे याबाबत कृषि तज्ञांचा पीक व्यवस्थापन सल्ला.

टोमॅटो पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचे नियंत्रण
टोमॅटो पिकावर येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींचे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४ मि.ली. किंवा डायमेथोएट १० मि.ली. किंवा ॲाक्झिडिमेटॅान मिथाईल १० मि.ली. किंवा थायोमेथोक्झाम ४ ग्रॅम १० लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे.  

टोमॅटो पिकावरील फळ पोखरणाऱ्या किडींचे नियंत्रण
टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी एचएएनपीव्ही  १० मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन ५ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.

टोमॅटो पिकावरील करपा व भुरी रोगाचे नियंत्रण
टोमॅटोवरील करपा व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब (७५ डब्ल्यू पी) २५ ग्रॅम व टेब्यूकोनॅझोल (२५ इसी) ५ मि.ली. १० लिटर पाणी या प्रमाणात पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या अलटून-पालटून कराव्यात.

वांगी पिकावरील फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण
वांगी पिकावरील फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॅास २० मि.ली. किंवा ट्रायॲझोफॉस २० मि.ली. किंवा स्पिनोसॅड ४ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

वांगी पिकावरील फळकुजव्या तसेच पानावरील ठिपके रोगाचे नियंत्रण
वांगी पिकावरील फळकुजव्या तसेच पानावरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेंडेझिम १० मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारावे.

वांगी पिकावरील भुरी रोगाचे नियंत्रण
वांगी पिकावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

कांदा पिकावरील फुल किड्यांचे नियंत्रण 
कांदा पिकावरील फुल किड्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॅास १० मि.ली. किंवा सायपरमेथ्रीन (२५%) ५ मि.ली. किंवा डेल्टामेथ्रीन (१ इसी) २० मि.ली. किंवा कार्बोसल्फान १० मि.ली. प्रति दहा लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारावे.

कांदा पिकावरील जांभळा करपा रोगाचे नियंत्रण 
कांद्यांवरील जांभळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅंकोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेंडेंझिम १० मि.ली. किंवा क्लोरोथॅलोनील २५ मि.ली. + १० मि.ली. चिकट द्राव १० लिटर पाण्यातून पंधरा दिवसाच्या अंतराने फवारावे.

भेंडी पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचे नियंत्रण 
भेंडी पिकावरील रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

भेंडी पिकावरील भुरी रोगाचे नियंत्रण 
भेंडीवरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप १० मि.ली.प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

भेंडी पिकावरील ठिपके रोगाचे नियंत्रण 
भेंडीवरील ठिपके रोगाच्या नियंत्रणासाठी मँकोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून १५ दिवसाच्या अंतराने गरजेनुसार फवारावे.

संकलन
डॉ. कल्याण देवळाणकर

निवृत्त कृषि विद्यापीठ शास्त्रज्ञ

Web Title: Vegetable Crop Management: Control of various pest diseases on tomato, brinjal, onion, okra; Crop management advice from agricultural experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.