ग्राहकांना दरमहा वीजबिल देण्यात येत असले तरी नियमित वीजबिल भरणारे ग्राहक मोजकेच आहेत. तत्पर वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून सवलत दिली जाते, तर मुदतीनंतर बिल भरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जातो. दंड भरण्यापेक्षा ग्राहकांनी वेळेवर वीजबिल भरून सवलतीचा लाभ घ्यावा.
वीज खरेदीसाठी संबंधित कंपन्यांना वेळेवर पैस न दिल्यास महावितरणला दंड, व्याजाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे महावितरणने दिलेली वीज देयके वेळेवर भरणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनो आपल्यालाही सवलत हवी असेल तर वीजबिल तत्पर भरा.
काही ग्राहक गो ग्रीन सेवेचा लाभ घेत ऑनलाइन वीजबिल स्वीकारून ऑनलाइन भरणा करून सवलतीचा लाभ मिळवितात. काही ग्राहक नियमित वीज देयके भरतात. मात्र, काही ग्राहक वीज बिल भरण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने वीजबिलाच्या रकमेसह दंडाची रक्कम भरावी लागते.
'गो ग्रीन'चा फायदा
काही ग्राहक दरमहा छापील वीज बिलाऐवजी ई-मेलवर वीजबिल स्वीकारून गो ग्रीन सेवेचा लाभ घेत आहेत. दरमहा दहा रुपयांप्रमाणे वार्षिक १२० रुपये आर्थिक सवलत ग्राहकांना मिळत आहे. शेतकऱ्यांनो याचाही आपण फायदा घेऊ शकता.
कशी मिळवाल सवलत
१) छापील बिला ऐवजी ई-बिलासाठी नोंदनी करा व प्रत्येक बिलामागे १० रूपयांचा गो-ग्रीन डिस्काउंट मिळवा.
नोंदणी करण्यासाठी लिंक: https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp
(यासाठी आवश्यक तुमचा ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट छापील बिलावर उपलब्ध आहे.)
२) डिजिटल माध्यमाद्वारे विज बिल भरा व ००.२५% (रु.५००/- पर्यंत) सवलत मिळवा. (टॅक्सेस व ड्यूटीज वगळून)
दोन महिन्यांचे बिल थकलं, तर तोडली जाते वीज
घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी १२० दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतर बिल न भरल्यास महावितरणकडून नोटीस दिली जाते. नंतर खंडितची कारवाई होते.
मुदतीनंतर बिल भरल्यास दंड
- ग्राहकांनी तत्पर बिल भरल्यास प्रत्येक बिलासाठी एक टक्का सवलत मिळते.
- ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्यांना ०.२५ टक्के सवलत दिली जाते.
- मुदतीनंतर बिल भरल्यास सव्वा टक्के दंड आकारला जातो.
अधिक वाचा: Jaminiche Bakshish Patra : जमिनीचे बक्षीसपत्र म्हणजे काय? आणि ते का करायचे वाचा सविस्तर