Lokmat Agro >स्मार्ट शेती > स्वतः पिकवलेला कृषीमाल निर्यात करायचाय? इथे होतंय प्रशिक्षण

स्वतः पिकवलेला कृषीमाल निर्यात करायचाय? इथे होतंय प्रशिक्षण

Want to export your own grown agricultural produce Training is happening here | स्वतः पिकवलेला कृषीमाल निर्यात करायचाय? इथे होतंय प्रशिक्षण

स्वतः पिकवलेला कृषीमाल निर्यात करायचाय? इथे होतंय प्रशिक्षण

फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स या संस्थेने १० मार्च रोजी "कृषिमाल निर्यात परिषद" आयोजित केली आहे.

फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स या संस्थेने १० मार्च रोजी "कृषिमाल निर्यात परिषद" आयोजित केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारत हा कृषीप्रधान देश आहे. पण जगाच्या तुलनेत भारताच्या कृषीचा विचार केला तर भारतातून खूप कमी प्रमाणात माल निर्यात केला जातो. भारतीय नागरिकांना निर्यात व्यवसायामध्ये खूप संधी आहेत. ग्रामीण भागात आणि शहरात बरेच उच्च शिक्षित बेरोजगार तरुण आहेत. त्यांच्यासाठी शेतमाल निर्यात हा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. तर फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स या संस्थेने १० मार्च रोजी "कृषिमाल निर्यात परिषद" आयोजित केली आहे.

या कार्यक्रमात निर्यातीसंदर्भाती सखोल माहिती देण्यात येणार असून यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, कंपनीचे मालक, तरूण, तरूणींना किंवा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नागरिकांना सहभागी होता येणार आहे.  या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये निर्यातीचे पूर्णपणे मार्गदर्श मिळणार आहे असं फोरम ऑफ इंटलेकच्युअल्सचे अध्यक्ष सतिश देशमुख यांनी सांगितलं आहे.

या तज्ञ वक्त्यांचे मार्गदर्शन
1. श्री. गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक निर्यात सल्लागार, कृषी आयुक्तालय
2. डॉ. प्रशांत नाईकवाडी,  राष्ट्रीय अध्यक्ष "रेसिड्यू फ्री & ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडेरेशन' (रोमीफ इंडिया)
3. श्री. अझहर तंबुवाला, कार्यकारी संचालक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, नाशिक
4. श्री. संजय शिरोडकर, संस्थापक संचालक, शेतीपूरक अग्रीटेक आणि सर्विसेस
5. श्री. किरण डोके, केळी निर्यातदार, राष्ट्रीय केळी निर्यात फोरम सदस्य (अपेडा)
6. सौ. वंदना पगार, मसाले निर्यातदार


प्रशिक्षणामध्ये या गोष्टींचा असेल सामावेश

  • निर्यातदार होण्यासाठीच्या आवश्यक नोंदणी प्रक्रिया
  • आवश्यक परवाने
  • मानके आणि प्रमाणिकरण (Registration, Certifications and Documentation process)
  • मार्केट रिसर्च: कुठल्या शेतमालाला कुठल्या देशात मागणी आहे. संभाव्य खरीददार डाटा-पिकनिहाय (Commodity wise).
  • विविध देशांतील रेसिड्यू फ्री गुणप्रत निकष व पूर्तता
  • यशस्वी तरुण निर्यातदार शेतकऱ्यांची यशोगाथा
  • कृषीमाल निर्यात- मनातील शंकांची उत्तरे, (FAQ- Frequently Asked Questions)
  • एकात्मिक कीड व्यवस्थापन (Integrated Paste Management)
  • बँकिंग फायनान्स व सरकारच्या योजना


ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी 'फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स'शी संपर्क करून या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

Web Title: Want to export your own grown agricultural produce Training is happening here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.