Lokmat Agro >स्मार्ट शेती > पिक उत्पादन खर्च कमी करायचाय? नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरा

पिक उत्पादन खर्च कमी करायचाय? नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरा

Want to reduce crop production costs? Use Nano Urea and Nano DAP | पिक उत्पादन खर्च कमी करायचाय? नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरा

पिक उत्पादन खर्च कमी करायचाय? नॅनो युरिया व नॅनो डीएपी वापरा

देशात नत्र व स्फुरद पिकांना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामध्ये युरिया आणि डीएपीचा क्रमांक सर्वात वरती लागतो. शाश्वत शेतीसाठी खतांचा वापर मर्यादित होणे ही काळाची गरज आहे. यासाठी नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्तम पर्याय ठरू शकतात.

देशात नत्र व स्फुरद पिकांना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामध्ये युरिया आणि डीएपीचा क्रमांक सर्वात वरती लागतो. शाश्वत शेतीसाठी खतांचा वापर मर्यादित होणे ही काळाची गरज आहे. यासाठी नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्तम पर्याय ठरू शकतात.

शेअर :

Join us
Join usNext

पिकांच्या वाढीसाठी १७ अनद्रव्यांची गरज असते त्यापैकी मुख्य अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद व पालाश ही तीन आहेत. आपल्या देशातील ५०% जमिनी नत्रामध्ये कमी असल्यामुळे व नत्र वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाची असलेली प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या हरितद्रव्याचा घटक असल्यामुळे नत्र पिकाला द्यावाच लागतो. तसेच स्फुरद वनस्पतीतील सर्व उत्ती आणि पेशींच्या वाढीसाठी तसेच जीवनसत्त्वे व खनिजे यांच्या संतुलित वापरासाठी आवश्यक असते. त्यामुळे स्फुरदाचा वापर करावा लागतो.

देशात नत्र व स्फुरद पिकांना देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतामध्ये युरिया आणि डीएपीचा क्रमांक सर्वात वरती लागतो. आपल्या देशामध्ये सर्वसाधारणपणे ३५० लाख टन युरिया व १०५ लाख टन डीएपीचा वापर प्रतिवर्षी केला जातो. युरिया हे पूर्णपणे सरकारी नियंत्रित खत असून दरवर्षी सर्वसाधारणपणे ६० ते ६५ हजार कोटी रुपये एवढी अनुदान युरियावर दिली जाते.
युरिया आणि डीएपी खताची कार्यक्षमता, त्यांच्यामुळे नैसर्गिक स्त्रोतांना पोहोचणारी हानी तसेच अनुदान, वाहतूक, साठवणूक यावरती होणारा खर्च यांचा विचार करता या दोन खतांना पर्यायी अथवा पूरक खतांचा वापर होणे आवश्यक आहे. वरील होणारी हानी टाळण्यासाठी व शाश्वत शेतीसाठी खतांचा वापर मर्यादित होणे ही काळाची गरज आहे. यासाठी नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) उत्तम पर्याय ठरू शकतात.

अशाच अपडेट्ससाठी join करा 'लोकमत ॲग्रो'चा व्हॉट्सॲप ग्रूप..  
https://chat.whatsapp.com/HV0xE9Q6mz4LMXStoq6Gpa

नॅनो युरिया (द्रवरूप) म्हणजे काय?
नॅनो युरिया हे एक द्रवरूप नत्रयुक्त खत असून त्यामध्ये ४ टक्के नत्र नॅनो कणांच्या स्वरूपात असते. त्यामधील नॅनो नत्र कणांचा आकार हा २० ते ५० नॅनोमीटर इतका असतो. एखाद्या वस्तूचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ जितके जास्त तितकी त्याची कार्यक्षमता जास्त. या भौतिकशास्त्रातील सिद्धांतावर नॅनो युरियाची निर्मिती केली गेली आहे. १ नॅनोमीटर म्हणजे १ मीटर चा ५०० कोटीवा भाग. सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास मानवी केसांची जाडी अंदाजे ८०,००० नॅनोमीटर असते. सध्या आपण वापरत असलेला बारीक युरिया याची तुलना जर नॅनो युरिया सोबत केली तर बारीक युरियाचा एक दाणा हा नॅनो युरियाच्या ५५००० कणाइतका असतो. नॅनो युरियाचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे बारीक युरिया पेक्षा १०,००० पटीने जास्त असते त्यामुळे त्याची कार्यक्षमता जास्त असते.

नॅनो युरियाचे फायदे
१) नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते खर्चात बचत होते आणि पर्यायाने शेतकऱ्याच्या एकूण उत्पन्नात वाढ होते.
२) पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते.
३) नॅनो युरियाची एक बाटली ५०० मिली आणि युरियाची एक गोणी ४५ किलो यांची कार्यक्षमता समान आहे. त्यामुळे पारंपारिक युरियाच्या तुलनेत नॅनो युरिया कमी लागतो तसेच शेतकऱ्यांचा वाहतूक व साठवणुकीवरील खर्च कमी होतो आणि देश हिताच्या दृष्टिकोनातून युरियासाठी द्यावे लागणारे अनुदान आणि साठवणूक वाहतुकीवरील खर्च सुद्धा कमी होतो.
४) नॅनो युरियाच्या वापरामुळे हवा, पाणी आणि जमीन यांची हानी थांबते ग्लोबल वार्मिंग साठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचे उत्सर्जन कमी होते.

अधिक वाचा: हिरवळीच्या खतांमुळे जमिनीला होतोय सेंद्रिय खतांचा पुरवठा

नॅनो डीएपी (द्रवरूप) म्हणजे काय?
नॅनो डीएपी (द्रवरूप) हे एक नवीन नॅनो खत आहे जे FCO (१९८५) अंतर्गत, २ मार्च २०२३ रोजी भारत सरकार ने अधिसूचित केले आहे. त्यात नायट्रोजन ८.० % आणि फॉस्फरस १६.०% आहे. नॅनो डीएपी (द्रवरूप) चा पृष्ठभागाच्या क्षेत्रफळ ते आकारमानाच्या दृष्टीने फायदा आहे कारण त्याचा कण आकार १०० नॅनोमीटर पेक्षा कमी आहे या अद्वितीय गुणधर्मामुळे ते बिया/मुळाच्या पृष्ठभागाच्या आत किंवा पानांच्या रंध्रातून आणि वनस्पतींच्या इतर छिद्रातून सहज प्रवेश करू शकतात. नॅनो डीएपी (द्रवरूप) चा चांगल्या प्रसाराची क्षमता आणि वनस्पती प्रणालीमध्ये एकत्रीकरण केल्याने बियाणे अधिक जोम, अधिक क्लोरोफिल, प्रकाश संश्लेषण कार्यक्षमता, चांगली गुणवत्ता आणि पीक उत्पादनात वाढ होते. नॅनो डीएपी (द्रवरूप) अचूक आणि लक्ष्यित वापराद्वारे पर्यावरणाला हानी न पोहोचवता पिकांच्या पोषणाची गरज पूर्ण करते नॅनो डीएपी (द्रवरूप) बियाणे किंवा मूळ उपचार म्हणून वापरणे आणि त्यानंतर पिकांच्या वाढीच्या गंभीर टप्प्यावर गरजेनुसार एक ते दोन पर्णपाती फवारण्या केल्याने पिकांना लागू होणाऱ्या पारंपरिक डीएपीमध्ये २५-५०% पर्यंत घट होऊ शकते.

नॅनो डीएपी (द्रवरूप) फायदे
१) नॅनो डीएपी (द्रवरूप) हा सर्व पिकांसाठी उपलब्ध नायट्रोजन आणि फॉस्फरस चा कार्यक्षम स्रोत आहे. याच्या वापरामुळे उभ्या पिकांमधील नायट्रोजन आणि फॉस्फरसची कमतरता दूर होते.
२) लवकर उगवण आणि जोम यासाठी बियाणे प्राइमर म्हणून फायदेशीर, पिकाची वाढ आणि गुणवत्ता वाढवते; पीक उत्पादन वाढवते
३) नॅनो डीएपी (द्रवरूप) हे स्वदेशी आणि विनाअनुदानित खत आहे.
४) हे पारंपारिक डीएपीपेक्षा स्वस्त आहे आणि शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आहे, माती, हवा आणि पाण्याचे प्रदूषण कमी होते
५) जैव-सुरक्षित आणि पर्यावरणास अनुकूल, कमी अवशेष असलेल्या हिरव्या शेतीसाठी योग्य.
६) साठवण आणि वाहतूक सुलभ होते.

नॅनो खतांची कार्यपद्धती
बिजप्रक्रिया व पिकवाढीच्या मुख्य अवस्थेमध्ये नॅनो युरिया व नॅनो डीएपी खतांची फवारणी करून पिकाच्या ५०% अन्नद्रव्याची गरज भागवता येते. नॅनो खते २ ते ४ मिली एक लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी केली असता नॅनो खतांतील अन्नद्रव्याचे शोषण पानावरील पर्णरंध्राच्याद्वारे पिकाच्या पेशीमध्ये होते. शोषण केलेली अन्नद्रव्ये पेशीतील रिक्तिकामध्ये साठवली जातात व पिकाच्या गरजेनुसार पिकाला पुरवली जाते. नॅनो कणांचा आकार, त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ, पर्णरंधेद्वारे शोषण, पेशींच्या रिक्तिकामध्ये साठवण आणि गरजेनुसार पुरवठा यामुळे नॅनो खतांची कार्यक्षमता ९० % पर्यंत जाते. नॅनो खते जमिनीमधून न देता, पिकाला फवारणीद्वारे देत असल्यामुळे खतांचा जमीन आणि पाण्याशी संबंध येत नाही आणि कार्यक्षमता चांगली असल्यामुळे हवे मध्ये सुद्धा वाया जात नाही. त्यामुळे नॅनो खते पर्यावरणपूरक व व शाश्वत शेती साठी पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील एक नवीन अविष्कार आहे.

Web Title: Want to reduce crop production costs? Use Nano Urea and Nano DAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.